या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती म्हणजे हि योजनेच शुभारंभ 26 ऑगस्टला झाला आहे, त्यामुळे ज्या नागरिकांनी 26 ऑगस्ट 2022 पूर्वी एसटी मध्य प्रवासासाठी आरक्षण केले असेल आणि 26 ऑगस्ट पासून एसटी प्रवास करण्याऱ्या राज्यातील नागरिकांना तिकिटाचा परतावा शासनाच्या निर्णया प्रमाणे दिला जाणार आहे, या संदर्भातील माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळच्या अधिवेशना दरम्यान करण्यात आला, या योजनेचे नाव ”अमृत जेष्ठ नागरिक” असे ठरविण्यात आले आहे, या योजनेचा शुभारंभ झाल्यावर एसटी महामंडळा कडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
वरिष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजना Highlights
योजनेचे नाव | अमृत जेष्ठ नागरिक (महाराष्ट्र एसटी बस मोफत प्रवास योजना ) |
---|---|
व्दारा सुरुवात | माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र |
योजनेचा शुभारंभ | 25 ऑगस्ट 2022 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे 75 वर्षावरील वयोगटातील नागरिक |
उद्देश्य | राज्यातील वयोवृध्द नागरिकांना आर्थिक सुविधा |
श्रेणी | योजना |
विभाग | महाराष्ट्र एसटी महामंडळ |
अमृत जेष्ठ नागरिक योजनेला लागणारी कागदपत्रे
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली राज्यातील वरिष्ठ नागरिकांसाठी असलेली एसटी बस मोफत प्रवास योजनेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्याच्या वरिष्ठ नागरिकांना प्रवासाच्या दरम्यान काही कागदपत्रांची आवश्यकता पडेल, वरिष्ठ नागरिकांना प्रवासा दरम्यान आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा वाहन परवाना किंवा निवडणूक ओळख पत्र व शासनाने प्रमाणित केलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र एसटी प्रवासा दरम्यान वाहकाला दाखविल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना योजने प्रमाणे सवलत मिळेल.
जेष्ठ नागरिक मोफत एसटी प्रवास योजनेचा लाभ हा राज्याच्या एमएसआरटीसी च्या शहरातील बसेस साठी उपलब्ध नसणार आहे, या योजनेचा लाभ केवळ राज्याच्या हद्दीत प्रवासा दरम्यानच मिळणार आहे, या अमृत जेष्ठ नागरिक योजनेच्या संबंधित घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच विधानसभेत केली होती. MSRT च्या बसेस स्वच्छ आणि सुसज्ज आहे. आणि एमएसआरटी कडे अनेक बसेस असल्यामुळे आणि त्या राज्यातील विश्वासपात्र आणि खात्रीलायक सेवा देणाऱ्या आहे.
वरिष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजना उद्दिष्टे
महाराष्ट्र सरकारचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास या योजनेचा उद्देश्य म्हणजे या योजनेला महाराष्ट्र सरकारला तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याची आहे जेणेकरून राज्यातील सर्व वरिष्ठ नागरिकांना तसेच गरीब वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल, तसेच करोना महामारी साथीच्या रोगांमुळे राज्यातील बरेच गरीब वरिष्ठ नागरिक बेरोजगार झालेले आहे, आणि त्यांना रोजगार मिळविणे कठीण झाले आहे, अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून तयार करण्यात आलेली हि वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना त्यांच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरणार आहे.
तसेच राज्यातील 65 ते 75 वर्ष वयोगोटातील नागरिकांना बसेस सेवांमध्ये तिकीट भाड्यावर 50 टक्के सवलत मिळेल. या योजनेच्या संबंधित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले, या ट्विट मध्ये त्यांनी असे लिहिले होते कि महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी कडून मोफत प्रवास योजनेचे प्रमाणपत्र आज वितरीत करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बस मधून मोफत प्रवास योजनेचा लाभ राज्यातील सुमारे पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचे लाभ
महाराष्ट्र सरकारने या जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेला राज्यातील तळागाळातील गरीब आणि सर्वच स्तरांवरील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे लक्ष ठेवले आहे, या योजनेच्या माध्यमातून शासनाला राज्यातील वयोवृध्द नागरिकांची आर्थिकदृष्ट्या मदत करायची आहे,
एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ राज्यातील 75 वर्ष वयोगटातील वरिष्ठ नागरिक महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसचा प्रवास, या योजनेला लागणारी योग्य प्रमाणपत्रे किंवा आवश्यक कागदपत्र सादर करून घेऊ शकतात (ओळखपत्र)
- देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या नंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री यांनी या जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेची घोषणा केली, आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
- जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ कसा मिळवावा :- राज्यातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रवासाला निघण्या अगोदर त्यांच्या कडे असलेले ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे (पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना या मधील कोणतेही एक, त्यानंतर त्यांना हे ओळखपत्र प्रवासा दरम्यान एसटी वाहकाला दाखवावे लागेल.
- एसटी वाहकाला हि ओळखपत्रे दाखविल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना त्यांना प्रवासासाठी लागणाऱ्या भाड्यासाठी सवलत मिळेल.
- जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी पात्रता :- महाराष्ट्र जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजने साठी खालीलप्रमाणे पात्र असणे आवश्यक आहे
- वरिष्ठ नागरिक ज्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे
- वरिष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षावरील वयोगटातील असणे आवश्यक आहे
- या योजनेचा लाभ फक्त एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना मिळणार आहे
- या जेष्ठ नागरिक एसटी बस मोफत प्रवास योजनेचा लाभ फक्त राज्याच्या हद्दीमध्यच मिळणार आहे म्हणजे वरिष्ठांना राज्याच्या आतमध्येच प्रवास करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने अमृत जेष्ठ नागरिक योजना म्हणजे, 75 वर्षे वयोगटातील वृध्द नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये प्रवास विनामुल्य केला आहे, या योजनेची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे, अशा प्रकारची विनामुल्य प्रवास योजना तयार करून शासनाने राज्यातील वयोवृध्द नागरिकांना आर्थिक आधार दिल्यासारखा आहे.