आज आम्ही तुम्हाला हेच सिक्रेट सांगणार आहोत. आपल्या सर्वांना उत्सुकता असतेच की या अभिनेत्रींची किंवा अभिनेत्यांची त्वचा नेहमीच कशी सुंदर दिसते. तर त्या मागे या सिक्रेटचा मोठा वाटा आहे. चला तर जाणून घेऊया तुम्हाला कधीही कोणी सांगितले नसेल अशा ब्युटी सिक्रेट बद्दल!
व्हिटॅमिन ई चे सिक्रेट
तुम्हाला कदाचित माहित नसेल पण व्हिटॅमिन ई कॅप्सूल जवळपास सर्वच बॉलीवूड अभिनेत्रींच्या स्कीन केअर रेजिमचा महत्त्वपूर्ण भाग असते. या कॅप्सूलचा उपायोग स्कीनचा ग्लो वाढवण्यासाठी आणि केसांची वाढ तसेच शाईन वाढवण्यासाठी देखील होतो. जर तुम्ही एखाद्या अशा सहज सोप्प्या उपायाच्या शोधात असाल ज्या माध्यमातून तुम्ही स्कीनवर सेलिब्रिटी सारखा ग्लो आणू इच्छित असाल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलच तुमच्यासाठी तो रामबाण उपाय आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेऊन ती फोडून त्यातील लिक्विड आपल्या फेस पॅक मध्ये मिक्स करावं. बस्स एवढे केलेत तरी तुमचा चेहरा तजेलदार होईल. तुम्ही जमल्यास थेट देखील हे चेहऱ्यावर लावू शकता. म्हणजेच कॅप्सूल फोडून त्यातील लिक्विड भांड्यात घ्या आणि चेहऱ्यावर लावून मसाज करा.
(वाचा :- अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल)
त्वचा राहते ब्राइट आणि ग्लॉसी
बॉलीवूड अभिनेत्री आपल्या चेहऱ्यावर असे प्रोडक्ट्स अप्लाय करतात ज्यावर कमीत कमी वेळ खर्च होईल आणि जास्तीत जास्त ग्लो त्वरित मिळेल असे करणारा एकमेव उपाय म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सूल होय. तुम्ही व्हिटॅमिन ई केसांवर लावतात हे ऐकले असेल कारण ही कॅप्सूल केसांना घनदाट, काळेभोर ठेवण्यात आणि शाईन वाढवण्यात मदत करते. पण तुम्ही याचा उपयोग बिनदिक्कतपणे केसांसाठी देखील करू शकता. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल फेस पॅक मध्ये मिक्स करून त्वचेवर लावा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला बॉलीवूड अभिनेत्रींसारखा ग्लो मिळेल.
आलीया भट्टला देखील आवडतो हा उपाय
तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोर वर व्हिटॅमिन ई कॅप्सूल सहज मिळेल. तुम्ही वेगवगेळ्या पद्धतीने व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करू शकता. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि आघाडीची अभिनेत्री असलेली आलीया भट्ट देखील या उपायाचा आवर्जून वापर करते. खरंतर हा तिच्या आवडत्या उपायांपैकी एक आहे. तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल अॅलोव्हेरा जेल मध्ये मिक्स करू शकता. बदाम तेलामध्ये मिक्स करून वापरू शकता. फेस पॅक मध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. नारळ तेलात मिक्स करू शकता. एवढचं काय तर तुम्ही बॉडी लोशन मध्ये देखील मिक्स करून वापरू शकता.
उजळदार चेह-यासाठी
व्हिटॅमिन ई चा वापर तुम्ही फेस सिरम सारखा देखील करू शकता. असे केल्याने चेहऱ्यावर रेडिऐंट ग्लो येतो. स्कीन अधिक तरुण आणि सुंदर दिसू लागते. रात्री झोपण्याआधी व्हिटॅमिन ई कॅप्सूल मध्ये असणारे तेल चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करा. असे केल्याने तुम्हाला एक आठवड्यातच फरक दिसून येईल आणि तुमचा चेहरा चमकून उठेल. म्हणून तुम्हालाही जर सुंदर त्वचा हवी असेल तर आवर्जून हा उपाय वापरा. व्हिटॅमिन ई कॅप्सून तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये सहजपणे मिळतील.
त्वचा दिसते तरुण आणि डार्क सर्कल्स फ्री
अथिया शेट्टी देखील आपली त्वचा तरुण आणि डार्क सर्कल्स फ्री ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा उपयोग करते. ती कॅप्सूल मध्ये असणारे लिक्विड प्लेटमध्ये घेऊन थेट त्वचेवर लावते आणि मग त्याला हळूवार मसाज करते. तुम्ही देखील पहा की अथियाचा चेहऱ्यावर एकही डाग नाही किंवा कसले निशाण नाहीत. डार्क सर्कल्स तर अगदी झूम करून पाहिले तरी दिसणार नाहीत. जर वाढत्या वयासोबत तुमची त्वचा सैल पडत असेल तर तुम्ही रात्री चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल अॅलोव्हेरा जेल मध्ये मिक्स करून लावा आणि झोपून जा. पहिल्याच वेळी तुम्हाला या उपायाचा जबरदस्त फरक दुसऱ्या दिवशी उठल्यावर दिसून येईल.