Home पुणे पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय | Crime

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय | Crime

0
पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय | Crime

[ad_1]

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

Crime in Pune: भारती विद्यापीठ पोलिसांनी पुण्यात (Pune) घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या (Domestic Ayurvedic Massage Center) नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे.

पुणे, 06 जून: भारती विद्यापीठ पोलिसांनी पुण्यात (Pune) घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या (Domestic Ayurvedic Massage Center) नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर, याठिकाणी छापा (raid) टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 50 वर्षाच्या महिलेसोबत 22 वर्षीय तरुणीला अटक (2 woman arrest) केली आहे. संबंधित महिला या तरुणीकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करून घेत होती. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करत आहेत.

कात्रज येथील संतोषनगर परिसरातील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या घटनेची पुष्टी केली आहे. त्यानंतर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी एका 50 वर्षीय महिलेसोबत  22 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतलं आहे. संबंधित 50 वर्षीय महिला पालघर येथील रहिवासी असणाऱ्या 22 वर्षीय तरुणीकडून हा व्यवसाय करून घेत असल्याचं पोलीस तपासात आढळलं आहे.

हे ही वाचा-एक रात्र, तीन जागा, अल्पवयीन मुलीवर 3 वेळा बलात्कार; मुंबईतली धक्कादायक घटना

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधन घावटे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. अशा प्रकारच्या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काही तरुणी गुंतल्या आहेत का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 6, 2021, 12:43 PM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here