Home महाराष्ट्र ‘मला लॉकडाउन आणि नॉकडाउन दोन्ही नकोत’; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना ‘हे’ आवाहन

‘मला लॉकडाउन आणि नॉकडाउन दोन्ही नकोत’; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना ‘हे’ आवाहन

0
‘मला लॉकडाउन आणि नॉकडाउन दोन्ही नकोत’; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना ‘हे’ आवाहन

मुंबई: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला. करोनाकाळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखवले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे असन कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरू करावेत. मला लॉकडाउन आणि नॉकडाउन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्राने उत्तम प्रकारे करोना या महासाथीची परिस्थिती हाताळली असू त्याची प्रशंसा जगभर होत आहे. असे असले तरी देखील करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत करोनाशी लढा देत अनेक उपाययोजना आपण केल्या आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात करोना विषाणूने आपले स्वरूप बदलले आहे. हे पाहता आपल्याला अधिक काळजी घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपण आता राज्यात अनलॉक करत आहोत. हे अनलॉक करत असताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत, असे सांगताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काळजी घेण्यावर अधिक भर दिला. आपण राज्यात एकदम काहाही शिथिल केलेले नाही. ही शिथिलता आणताना आपण काही पातळ्या ठरवलेल्या आहेत. काही निकष ठरवलेले आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. मात्र आपल्याला ‘साप भी मरे आणि लाठी भी ना टुटे’. असे वागावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.



आपल्याकडे करोना धोकादायक पद्धतीने वाढल्यामुळेच आपल्याला लॉकडाउन सारखा निर्णय घ्यावा लागला. आपण लॉकडाउन केले नसते तर करोनाने आपल्याला नॉकडाउन केले असते असे मुख्यमंत्री म्हणाले.



कामगारांचे लसीकरण करणे आवश्यक

करोनाचा पराभव करण्यासाठी मास्कचा वापर करणे, कामगारांचे लसीकरण करणे, पाळ्यांमध्ये काम करणे, तसेच घरून काम करण्यास प्रोत्साहन देणे असे उपाय आपल्याला योजावे लागतील, असे मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. याबरोबरच ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे अशा लोकांसाठी बायो-बबल तयार केला पाहिजे. यामध्ये आवश्यक कामगारांना कामाच्या ठिकाणी राहता यावे यासाठी तशी सुविधा निर्माण केली गेली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here