Home पुणे अनलॉकची नियमावली, लग्न सोहळ्यासाठी ‘अशी’ असेल परवानगी | Nagpur

अनलॉकची नियमावली, लग्न सोहळ्यासाठी ‘अशी’ असेल परवानगी | Nagpur

0
अनलॉकची नियमावली, लग्न सोहळ्यासाठी ‘अशी’ असेल परवानगी | Nagpur

[ad_1]

अनलॉकची नियमावली, लग्न सोहळ्यासाठी 'अशी' असेल परवानगी

Maharashtra Unlock: येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. लग्न (wedding ceremony) करणाऱ्यांसह हॉल चालकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे.

मुंबई, 05 जून: येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra Unlock) अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी लग्न (wedding ceremony) करणाऱ्यांसह हॉल चालकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. लग्न सोहळ्यासाठीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

लग्न सोहळ्यासाठी अशी असेल परवानगी

राज्य सरकारनं केलेल्या वर्गीकरणानुसार पहिल्या स्तरात लग्न सोहळ्यास कोणतेही बंधनं नसणार आहेत. दुसऱ्या स्तरात लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. तिसऱ्या स्तरात लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती बंधनकारक असेल. तर चौथ्यामध्ये लग्न सोहळ्यास केवळ 25 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे.

महाराष्ट्र अनलॉक

कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल. (Maharashtra government notification on relaxations to lockdown)

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भात घोषणा केली होती. मात्र, काही तासातच राज्य सरकारनं खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात अनलॉकसाठी पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.

हेही वाचा- कसं आहे ‘पाच’ टप्प्यातील महाराष्ट्र अनलॉकचं वर्गीकरण, वाचा सविस्तर

अंत्यविधीसाठीचे नियम

अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. यावेळी राज्य सरकारनं अंत्यविधीसाठी काही निर्बंध शिथिल केले आहेत.

हेही वाचा- संभाजीराजे छत्रपती यांचं नवं ट्वीट; शेअर केला ‘हा’ ऐतिहासिक फोटो

अंत्यविधीसाठी पहिल्या दोन स्तरात कोणतीही बंधनं घातली नाहीत. अंत्यविधीची निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तिसऱ्या चौथ्या टप्प्यात 20 जणांच्या उपस्थिती बंधनकारक असणार आहेत. पाचव्या टप्प्यात निर्बंध कायम असतील.


Published by:
Pooja Vichare


First published:
June 5, 2021, 11:08 AM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here