Home पुणे दिवसा डब्बेवाला अन् रात्री दरोडेखोर; पुणे पोलिसांनी सराईताच्या आवळल्या मुसक्या

दिवसा डब्बेवाला अन् रात्री दरोडेखोर; पुणे पोलिसांनी सराईताच्या आवळल्या मुसक्या

0
दिवसा डब्बेवाला अन् रात्री दरोडेखोर; पुणे पोलिसांनी सराईताच्या आवळल्या मुसक्या

पुणे, 08 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने एका सराईत दरोडेखोराला (Arrest Robber) सापळा रचून अटक केली आहे. संबंधित दरोडेखोर दिवसा जेवणाचे डब्बे पुरवण्याचं (delivers tiffin during  day) काम करायचा आणि रात्री त्याच घरात शिरून चोऱ्या (breaks houses at night) करण्याचा. आरोपीने पुण्यातील वानवडी परिसरात आतापर्यंत 15 हून अधिक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या घरातून तब्बल 6.7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी आणि 2 दुचाक्या, 2 टिव्ही अशा वस्तुंचा समावेश आहे.

संबंधित अटक केलेल्या आरोपी युवकाचं नाव आकाश उमाप असून 5 जून रोजी आणखी एका घरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी उमाप याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने वानवडी परिसरात आतापर्यंत 15 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. संबंधित दोन्ही आरोपी सध्या फरार असून पुणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी आकाश उमाप दिवसा डब्बे देण्याचं काम करतो आणि रात्री त्याच घरात चोरी करतो, अशी गुप्त माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांना मिळाली होती. त्याचबरोबर वानवडी येथून एका दुचाकीची चोरी करताना आरोपी उमाप सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही निदर्शनास आला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेचं विशेष पथक आरोपीवर नजर ठेवून होतं. दरम्यान 5 जून रोजी आरोपी उमाप आणखी एका घरात चोरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हे ही वाचा- Gulabrao Patil: पाणी टंचाईवरुन भाजपाने दाखविले गुलाबराव पाटलांना काळे झेंडे

आरोपी उमापने पोलीस चौकशीत 15 ठिकाणी घरफोड्या आणि छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपी युवक दिवसा घरपोहोच जेवणाचे डब्बे द्यायला गेल्यानंतर कोणत्या घरात कधी चोरी करता येईल, याबाबत चाचपणी करायचा. यानंतर संधी मिळताच आरोपी आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने संबंधित घरावर डल्ला मारायचा. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने आरोपीने चोरी केलेला सर्व ऐवज आपल्याच घरात लपवून ठेवला होता. कारण चोरलेल्या वस्तू आणि दागिने विकत घेण्यासाठी त्याला योग्य ग्राहक मिळत नव्हता.


[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here