सोमनाथ देवकाते | संपादक : शासननामा न्यूज ऑनलाईन
भारतमातेचा सच्चा सुपुत्र, सामाजिक समरसतेसाठी व राष्ट्र सेवेसाठी आयुष्य खर्च करणारे श्री अशोकराव चोरमले – पाथर्डी यांचा शाळेच्या दाखल्यावरील जन्मदिन आज आहे.
लहानपणापासून धार्मिक असल्यामुळे सामाजिक कामात प्रचंड आवड,1986 ला बी.एस.सी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच जून १९८६ ते १९९५ अशी ऐन उमेदीतील ९ वर्ष घरदार सोडून विश्व हिंदू परिषदेचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून निस्वार्थपणे राष्ट्र सेवेसाठी दिली. विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून प्रथम रायगड जिल्ह्यातील गाठेमाळ वनवासी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख म्हणून २ वर्षे काम केले. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे बीड जिल्हा संघटन मंत्री , नगर जिल्हा संघटन मंत्री व पुणे विभाग ( पुणे, नगर , सोलापूर जिल्हे) संघटन मंत्री म्हणून १९९५ पर्यंत काम केले. या काळात विश्व हिंदू परिषदेच्या संघटनात्मक कामाबरोबरच श्रीराम जन्मभूमी लढ्यातील सर्व आंदोलनात व अयोध्यातील कारसेवेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
अशोकराव चोरमले यांनी महाराष्ट्र धनगर महासंघाचे राज्य संघटनमंत्री म्हणूनही काही वर्षे काम केले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून धनगर समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास केला.
जून १९९५ मध्ये भारतीय जनता पार्टी नगर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून भाजपाच्या कामाला सुरुवात केली . तेव्हापासून आतापर्यंत भाजपा चे विविध पदावर काम करत आहेत.
ते चांगले वक्ते असून उत्तम योग व प्राणायाम शिक्षक आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या मोठ्या महामंडळाचे राज्यस्तरीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच जिल्हा दूरध्वनी सल्लागार समिती, जिल्हा दक्षता समिती व तालुका समन्वय समिती या शासकीय समित्यावरही त्यांनी प्रभावी काम केले आहे.
महाराष्ट्रातील भटके विमुक्त समाजाचा त्यांचा चांगला अभ्यास असून सध्या भारतीय जनता पार्टी च्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस ( संघटन) म्हणून ते काम करत आहेत.
त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मुंबई पत्रकार संघाचा समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे .
भारतमाता जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत . या प्रतिष्ठान च्या वतीने भटक्या विमुक्त समाजातील वंचित, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मागील २० वर्ष विनाअनुदानावर आदर्श माध्यमिक आश्रमशाळा चालवली. सध्या शाळा अनुदानित झाली आहे..
अशोकराव चोरमले हे मूळचे संघ स्वयंसेवक , कडक शिस्तीचे असल्याने ते वाढदिवस साजरा करीत नसले तरी त्यांचे अनेक चाहते व शुभचिंतकांच्या प्रेमळ भावनांचा आदर करण्याकरिता हा लेख प्रपंच करीत आहोत.
” अशोक दा.चोरमले “
९४२३३९००५५
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपला.
गणेश गर्जे,
पाथर्डी.