Home पुणे मित्रांच्या मदतीनं तयार केले प्रेयसीचे व्हिडिओ, नंतर Blackmail करत सर्वांनी केले सामुहिक अत्याचार | Crime

मित्रांच्या मदतीनं तयार केले प्रेयसीचे व्हिडिओ, नंतर Blackmail करत सर्वांनी केले सामुहिक अत्याचार | Crime

0
मित्रांच्या मदतीनं तयार केले प्रेयसीचे व्हिडिओ, नंतर Blackmail करत सर्वांनी केले सामुहिक अत्याचार | Crime

[ad_1]

मित्रांच्या मदतीनं तयार केले प्रेयसीचे व्हिडिओ, Blackmail करत सर्वांनी केले सामुहिक अत्याचार

Pimpri Chinchwad news पीडितेनं मोठ्या हिमतीनं देहूरोड पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करत, पोलिसांना सर्व माहिती दिली. गुन्हा दाखल होताच देहू रोड पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना एका पाठोपाठ एक ताब्यात घेतलं.

पुणे, 03 जून : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीला तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचा प्रियकरच या तरुणीवर मित्रांसह अत्याचार (Young Girl Blackmailin and sexual abuse) करत होता. अनेक महिने हा प्रकार सुरू होता. बदनामीच्या भीतीने तरुणी शांत होती. मात्र अखेर तिनं त्रासाला कंटाळून या प्रकरणी तक्रार देताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

(वाचा-घटस्फोटापूर्वी बायकोनं फोडलं नवऱ्याचं बिंग, पोलिसांना माहिती देताच नवरा फरार)

पिंपरी चिंचपडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. या नात्यातून ते दोघं अनेकदा एकमेकांना भेटत होते. मात्र प्रियकराच्या मनामध्ये वेगळाच कट शिजत होता. त्याचं कारण म्हणजे ही तरुणी जेव्हा तरुणाला म्हणजे तिच्या प्रियकला भेटायची, त्यावेळी त्यांचे मित्र नेहमी त्याच्याबरोबर असायचे. तरुणाच्या मित्रांनी संधीचा फायदा घेत या तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून घेतले होते. त्यानंतर या तरुणीला धमकावून आणि ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्याचा खेळ या तरुणांनी सुरू केला.

(वाचा-कोपरगाव : सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह)

मोबाईलमध्ये शूट केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, तरुणाच्या मित्रांनी या तरुणीचं लैंगिक शोषण करायला सुरुवात केली. एक दोनदा नव्हे तर अनेकदा तरुणीवर अत्याचार करण्यात आले. यात अधिक वाईट म्हणजे तरुणीचा प्रियकरच मित्रांच्या मदतीनं तिच्यावर सामुहिकपणे अत्याचार करत होता. जवळपास 5 महिने हा सर्व प्रकार सुरू होता. पण अखेर कंटालून पीडितेने पोलिसांत तक्रार करत या अत्याचाराबाबत माहिती दिली.

पीडितेनं मोठ्या हिमतीनं देहूरोड पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करत, पोलिसांना सर्व माहिती दिली. गुन्हा दाखल होताच देहू रोड पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना एका पाठोपाठ एक ताब्यात घेतलं. मुख्य आरोपी  नोमान उर्फ ​​अरबाज जावेद खानसह, सुलतान उर्फ ​​मुस्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ ​​मन्नान जावेद खान, आणि सोहेल पिरजादे यांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 3, 2021, 6:16 PM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here