
[ad_1]

राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई, 03 जून : राज्यात कोरोनाबाधित (maharashtra Corona cases) रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे लॉकडाऊन (Lockdown) हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे (Pune) जिल्ह्याने आधीच कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे पुण्यात आता लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेण्यात येण्यात यावा, अशी मागणी होत होती. पण, अजूनही पुणे पाचव्या लेव्हलमध्ये आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन कायम आहे.
राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वेगवेगळ्या लेव्हलमध्ये अनलॉक करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे, तर दुसर्या 5 आणि तिसरा टप्प्यात 10 आणि चौथ्या टप्प्यात २ जिल्ह्यांचा सहभाग आहे. पण, पुण्यात मात्र, लॉकडाऊन कायम असणार आहे.
पुण्यात कोरोना पॉझिटीव्ही रेट हा 6.5 टक्के आहे. 80 टक्के ऑक्सिजन बेड्स रिकामे आहे. पण, अजूनही 900 पेशंट्स ऑक्सिजनवर आहे.
ग्रामीण भागात काही ठिकाणी पॉझिटीव्ही रेट 10 टक्क्यांच्या आसपास आहे. पुणे ग्रामीणचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट पुणे शहरापेक्षा अधिक आहे. पुणे जिल्हा लेव्हल 5 चे निकष पूर्ण करायला अजून आठवडा जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
BREAKING NEWS : अखेर राज्यात बारावीची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारची मोठी घोषणा
दरम्यान, पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे. तिथं पूर्णपणे लॉकडाऊन हटवण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. अनलॉक, लॉकडाऊन संदर्भात 5 टप्प्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, थिएटर्स, क्रीडा, शूटिंग नियमित निर्णय घेतला आहे. यात सरकारनं सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नाच्या हॉल(wedding ceremony)लाही परवानगी देण्यात आली आहे.
PAN-Aadhaar घरबसल्या करा लिंक; असं तपासा तुमचं Linking Status
पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेनं व्यवहार सुरु राहतील असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्या थिएटर्स, कार्यालयं, शूटिंग, जिम, सलून सुरु राहतील. त्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमास 50 टक्के परवानगी असेल. लग्न सोहळ्यास हॉलना 50 टक्के आणि जास्तीत जास्त 100 लोकांना उपस्थिती राहण्याची मुभा असेल. अंत्यविधी सोहळ्यास सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल.
तिसऱ्या टप्प्यात मनोरंजन कार्यक्रमास 50 टक्के सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 पर्यंत खुले असणार. तर लग्नसोहळ्यास 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील.
Tags:
[ad_2]
Source link