Home पुणे खडकवासला धरणाचा भूमिगत कालवा प्रकल्प बारगळला; PMRDA ने दिला नकार

खडकवासला धरणाचा भूमिगत कालवा प्रकल्प बारगळला; PMRDA ने दिला नकार

0
खडकवासला धरणाचा भूमिगत कालवा प्रकल्प बारगळला; PMRDA ने दिला नकार
पुणे, 09 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

खडकवासला ते फुरसुंगी (Khadakwasla to Fursungi) दरम्यान असलेला 28 किमीचा कालवा भूमिगत करण्याचा (underground canal project) विचार मागील काही दिवसांपासून सुरू होता. पण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) या प्रकल्पाला मंजूरी न दिल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा बारगळला आहे. संबंधित कालवा भूमिगत केल्यानंतर ‘पीएमआरडीए’ आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतील हजारो हेक्टर जागा रिक्त होईल. ज्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ शकतो, त्यातून मोठा निधी उभारून भूमिगत कालव्याचा खर्च भागवता येईल, अशी ही योजना होती.

खरंतर, खडवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान 28 किमीचा कालवा आहे. हा कालवा  ‘पीएमआरडीए’ आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या कालव्याने पुण्यातील बरीच जागा व्यापली आहे. त्यामुळे हा कालवा भूमिगत करण्याचा विचार केला जात होता. हा कालवा भूमिगत करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याचबरोबर कालवा भूमिगत केल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला, तर त्यातून जवळपास 20 हजार कोटींचा निधी उभारला जाऊ शकतो.

त्यामुळे हा कालवा भूमिगत करण्यासाठीचा खर्च पालिकेला आपल्या खिशातून करावा लागणार नव्हता. त्याचबरोबर हा कालवा भूमिगत केल्यामुळे बाष्पीभवन होऊन वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचेल. हेच पाणी पीएमआरडीएला उपलब्ध करून देता येऊ शकतं, असंही जलसंपदा विभागाचे आयोजन होतं. त्यासाठी या प्रकल्पाबाबतचा सविस्तर अहवाल PMRDA ने तयार करावा अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला होती. पण PMRDA ने या प्रकल्पाला नकार दिल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा बारगळला आहे.

हे ही वाचा – अरे देवा! डेल्टानंतर भारतात कोरोनाचं आणखी एक भयंकर रूप; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन

विशेष म्हणजे यापूर्वीही जलसंपदा विभागाने भूमिगत कालव्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवला होता. कालव्यावरील रिक्त जागा खासगी व्यावसायिकाला उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी संबंधित व्यावसायिकाने बोगद्याच्या कामाचा खर्च करावा आणि व्यावसायिकाला जागेच्या मोबदल्यात महापालिकेने टीडीआर द्यावा, असा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर शहरात बराच गदारोळ झाला होता. त्यामुळे महापालिकेने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. यानंतर महापालिकेनं दुसऱ्यांदा या प्रकल्पाला नकार दिला आहे.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here