Home पुणे मावळ : अश्लील Video व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार | Crime

मावळ : अश्लील Video व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार | Crime

0
मावळ : अश्लील Video व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार | Crime

[ad_1]

अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केल्याची धक्कादायक घटना मावळ (Maval Rape news) तालुक्यातील देहूरोड शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 2 जून : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केल्याची धक्कादायक घटना मावळ (Maval Rape news) तालुक्यातील देहूरोड शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीनं देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हे कृत्य करणाऱ्या आरोपींविरोधात कलम 342, 376 (1), 376 (ड), 377, 323, 504, 506, 120 (ब), आय.टी ॲक्ट 67, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3 (1) (12) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेल्या या प्रकारावरून अरबाज जाविद खान, मुस्ताक सलीम सय्यद, सोहेल शेरअली पिरजादे ,रियाज जाविद खान तसेच दोन अल्पवयीन मुलांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे वाचा – EXPLAINER: माणसात आढळलेला बर्ड फ्लूचा स्ट्रेन कितपत घातक? जाणून घ्या कसा होतो प्रसार

मागील पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलीचे अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले होते. त्यानंतर तिला जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास आरोपी वेळोवेळी भाग पाडत होते. नराधमांच्या या प्रकाराला तरुणी वैतागली होती. संबंधित आरोपींच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं ही बाब अखेर आपल्या नातेवाइकांना सांगितली.

हे वाचा – पुण्यात लसीकरणावरून युवासेना-भाजपात श्रेयवादाची लढाई; महापौर येण्यापूर्वीच युवासेनेकडून प्रमाणपत्र वाटप

त्यानुसार पीडित तरुणीच्या तक्रारीवरून देहूरोड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांच्या गोठ्यात तसेच देहूरोड शहरातील स्मशानभूमीजवळ असलेल्या निर्जनस्थळी पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. देहूरोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ कारवाई करून आरोपींना गजाआड केले आहे. तर संबंधित प्रकरणातील पीडित तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. याबाबत घटनेचा सखोल तपास सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील करत आहेत. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. संबंधित आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 2, 2021, 7:48 PM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here