Home महाराष्ट्र दुध आणायला गेले आणि मागे क्षणात संपलं कुटुंब, ६ मुलांसह १० जणांचा मृत्यू

दुध आणायला गेले आणि मागे क्षणात संपलं कुटुंब, ६ मुलांसह १० जणांचा मृत्यू

0
दुध आणायला गेले आणि मागे क्षणात संपलं कुटुंब, ६ मुलांसह १० जणांचा मृत्यू

मुंबई : (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मालवणी भागात चार मजली इमारत कोसळली (Four Story Building Collapses. या भीषण अपघातामध्ये तब्बल ११ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याच दुर्घटनेमध्ये मोहम्मद रफी नामक व्यक्तिचे संपूर्ण कुटुंबच संपले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीत राहणारा मोहम्मद रफी हे अपघात होण्याआधी दूध आणण्यासाठी घराबाहेर गेले होते, जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांचं जग पूर्णपणे उध्वस्त झालं होतं.

धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये मोहम्मद रफींच्या 6 मुलांसह कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफी यांच्या कुटुंबात 12 लोक होते. ज्यामध्ये सहा मुले व चार वयस्कर लोक होते. नेहमीप्रमाणे दुध आणण्यासाठी ते गेले पण परत आल्यानंतर त्यांच्या काळाजाचा ठोका चुकला होता. त्यांचं हसतं खेळतं कुटुंब या अपघातात पूर्णपणे नष्ट झालं.

रफीच्या कुटुंबातील 10 लोकांचा मृत्यू

या अपघातात मोहम्मद रफी यांच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांचे अश्रू थांबत नाहीयेत. हा अपघात चार मजली इमारत कोसळल्यामुळे झाला. बुधवारी दुपारी अकराच्या सुमारास मुसळधार पावसामुळे एक इमारत दुसर्‍या इमारतीवर कोसळली. या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 8 लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. मृतांमध्ये काही लहान मुलंही असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दल व पोलिसांचे सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम चालु आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here