नवी दिल्ली, 10 जून : (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन
ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार लोकांना गंडा घालत असल्याचं उघडकीस येत आहे. याबाबत सायबर क्राईम पोलीस तसंच बँका, सरकार वारंवार सावधगिरीचा इशारा देत असतात. बँका कधीही तुमचे पिन क्रमांक, पासवर्ड मागत नाही. त्यामुळे बँकेचं नाव सांगून कोणतीही अनोळखी व्यक्तीं कॉल करून माहिती मागत असेल, तर देऊ नका. बँक डीटेल्स, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती, पिन क्रमांक कोणालाही देऊ नका. सुरक्षित नसलेल्या वेबसाईटवर आपली माहिती भरू नका.
कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, याद्वारे हकॅर्स तुमचा डेटा मिळवून तुमचं बँक खातं रिकामं करू शकतात. अशा अनेक सूचना सतत दिल्या जात असतात. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात, रोज नवनवीन लोक या भामट्यांच्या सापळ्यात अडकतात आणि आपलं नुकसान करून घेतात.
अशीच एक ऑनलाईन फसवणुकीची घटना नुकतीच पुण्यात (Pune) घडली आहे. एका व्यावसायिकाला पेट्रोल पंप परवाना (Petrol Pump License) मिळवून देण्याचं आमिष दाखवून 7 लाख 80 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. स्वामिनाथन सिंग असं या व्यावसायिकाचं नाव असून, त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.