Home महाराष्ट्र Ahilyadevi Holkar Punyatithi : सांस्कृतिक भारताच्या जीर्णोद्धार कर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर !!!

Ahilyadevi Holkar Punyatithi : सांस्कृतिक भारताच्या जीर्णोद्धार कर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर !!!

0
Ahilyadevi Holkar Punyatithi : सांस्कृतिक भारताच्या जीर्णोद्धार कर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर !!!

पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

भारताच्या संस्कृतीचे व समृध्दी चे जगाला नेहमीच आकर्षण राहिलेले याच आकर्षणाने व उत्सुकतेने जगातील अनेक देशांना भारताच्या संस्कृतीचे ज्ञान घ्यावेसे वाटले आणि काही राज्यकर्त्यांना भारत सोन्याची खाण वाटला याच इच्छेने त्यांनी भारतावर आक्रमणे केली आणि पराजीत मानसिकता दर्शवण्यासाठी या देशातील मंदिरे , संस्कृतिक आस्था केंद्रे उध्वस्त करण्याचा कार्यक्रम इतिहास काळात परदेशी आक्रमकांनी केला.

पण माणसाची आस्था जगली तरच माणूस जगू शकेल आणि जीवन संघर्ष करू शकेल याच विचाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतातील संस्कृतिक केंद्रांचा जीर्णोद्धार केला आणि जगाला भारतीय संस्कृतीची महानता दाखवून दिली

छत्रपती शिवाजमहाराजांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी लढणाऱ्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाने घडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि अटक ते कटक आपल्या खाजगीचा खजिन्यातून लोकउपयोगी कामे केली कल्याणकारी राज्याची उदहरण निर्माण केली

भारतीय राज्य घटनेतील मूल्ये अापल्याला पुण्य श्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात निदर्शनास येतात यावरूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची दूरदृष्टी दिसते
पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यानी त्यांच्या २८ वर्षांच्या कार्यकाळात रयतेच्या प्रजेच्या हितांचे रक्षण केले त्याच बरोबर प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे याची व्यवस्था केली होळकरांच्या न्याय व्यवस्थेच्या कार्याची चर्चा सबंध देशभर होत असे. पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, न्यायकरण, हे स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहेत पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here