Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोण दिलशभुल करतंय? संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

कोण दिलशभुल करतंय? संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

0
कोण दिलशभुल करतंय? संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

अहमदनगर, 12 जून : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापूरमध्ये 16 जूनला आंदोलन करण्यात येणार आहे. पण, आंदोलनाच्या भूमिकेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. ‘मी मूक आंदोलनाची भूमिका घेतली आणि चंद्रकांत पाटील काही म्हणो’ असा टोला संभाजीराजेंनी लगावला आहे.

छत्रपती संभाजीराजे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. कोपर्डी येथे जाणार असून पीडितेच्या  कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘२०१६ पासून कोपर्डी घटनेच्या दोषींवर निकाल अजूनही अंमलात आलेला नाही. या प्रकरणाला चार वर्षे का लागली? राज्य सरकारने काय करावं? या दृष्टीने माझा कोपर्डी दौरा आहे.   २०१६  ला घटना घडली, २०१७ निकाल लागला. प्रकरण हायकोर्टात गेलं. दोषींच्या दोन वर्षे संधीचा कालावधीही संपला, पण पुढची कारवाई का झाली नाही? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थितीत केला.

‘ कोपर्डी प्रकरणी राज्य सरकारला विनंती, स्पेशल बेंचच्या माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी उच्च न्यायालयाकडे मागणी करावी’ अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.

‘कोण दिलशभुल करतंय? हे सर्वांना माहिती आहे. चंद्रकांतदादा पाटील लाख म्हणत असतील. मी मोर्चा म्हटलेलो नाही. मूक आंदोलन करणार हीच भूमिका. आता लोकप्रतिनिधी बोलावं, ही भूमिका आहे, असं म्हणत संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

काय म्हणाले होते पाटील?

‘संभाजीराजे यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सुज्ञ आहे. संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहोत का? आधी मोर्चा काढतो म्हटला, नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटला. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हटला. नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे. 16 तारखेचा मोर्चा काढणार नाही असं म्हटलोच नाही असं म्हणणार असाल तर इट्स ओके’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here