याच कारणामुळे एका कार्यक्रमात जान्हवीचा आकर्षक साडी लुक, ताराचा सेक्सी लेहंगा आणि सारा अली खानच्या चिकनकारी ड्रेस लुकवर ऐश्वर्या राय-बच्चनचा पारंपरिक ड्रेसमधील अवतार भारी पडल्याचं दिसलं. ऐश्वर्या सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही चाहत्यांमधील तिची क्रेझ आजही कायम आहे. जेनेलिया डिसुझाच्या दिराच्या लग्नामध्येही तिनं परिधान केलेल्या पोषाखाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती.
ऐश्वर्यावरच नजर राहिली होती खिळून
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुखचं २०१२ मध्ये धुमधडाक्यात लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्यामध्ये ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनसह उपस्थित राहिली होती. आराध्या बच्चनच्या जन्माच्या चार महिन्यानंतर ती पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
लग्नसोहळ्यासाठी ऐश्वर्यानं प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अबू जानी संदीप खोसलाच्या कलेक्शनमधील ड्रेसची निवड केली होती. तिनं ज्या प्रकारचे लुक व ड्रेसचं स्टायलिंग केलं होतं, त्याचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. ऐश्वर्या या ड्रेसमध्ये खूपच सुंदर व मोहक दिसत होती.
ऐश्वर्याचा मोहक लुक
पहिल्यांदाचा मातृत्वाच्या अनुभवाचा आनंद घेणाऱ्या ऐश्वर्या रायने स्वतःसाठी डिझाइनरच्या कलेक्शनमधील ओवरसाइझ्ड कुर्ता व मॅचिंग चुडीदारची निवड केली होती. या ड्रेसवर तिनं वजनदार एम्ब्रॉयडरी असणारा दुपट्टा परिधान केला होता. दरम्यान हा ड्रेस तयार करण्यासाठी पूर्णतः सिल्क फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. या ड्रेसमध्ये ऐश्वर्या मोहक व आकर्षक दिसत होती.
दरम्यान, प्रेग्नेंसीनंतर काही महिलांच्या शरीराचे वजन वाढते तसंच पोट देखील सुटते. ऐश्वर्यानंही या समस्येचा सामना केला होता. यामुळेच तिनं अशा पद्धतीचा सैल पण आकर्षक ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळालं.
ग्लॅमरस आणि पारंपरिक लुकचे मिश्रण
ऐश्वर्या राय – बच्चनने आयव्हरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर रेशीमच्या धाग्यांपासून फ्लोरल मोटिफ्स तयार करण्यात आले होते. राउंड नेकलाइन असणाऱ्या या ड्रेसमध्ये फुल स्लीव्ह्ज डिझाइन आपण पाहू शकता, ज्यावर सोने व चांदीच्या तारांपासून एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलं होतं.
या पारंपरिक आउटफिटमुळे ऐश्वर्याला आकर्षक व कम्फर्टेबल लुक मिळाला होता. कुर्त्याच्या हेमलाइनवर मोठ्या-मोठ्या आकारात फुलांचे डिझाइन जोडण्यात आलं होतं. हे डिझाइन ओढणीवरील डिझाइनशी मिळते-जुळते होते.
ऐश्वर्याचा परफेक्ट लुक
ऐश्वर्या रायचा हा स्टायलिश लुक आई होणाऱ्या किंवा मातृत्त्वाचा अनुभव घेणाऱ्या महिला फॉलो करू शकतात. परफेक्ट लुक मिळावा यासाठी अभिनेत्रीनं कमीत कमी मेकअपसह लिपस्टिक, कोहल आईज अशा ब्युटी प्रोडक्टचा वापर केला होता. तिनं हेअरस्टाइल सुद्धा साध्या पद्धतीची केली होती. डिझाइनरच्या कलेक्शनमधूनच तिनं ड्रेसशी मॅचिंग असणारे फ्लॅट्स घातले होते.
विशेष म्हणजे ऐश्वर्यानं कोणत्याही प्रकारे वजनदार ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी परिधान केली नव्हती. तर स्वतःच्या लग्नात मिळालेल्या सोन्याच्या बांगड्या तिनं हातात घातल्या होत्या.