Home महाराष्ट्र Maratha Aarkshan:मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; CM एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन उदय सामंत जालन्याकडे रवाना

Maratha Aarkshan:मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; CM एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन उदय सामंत जालन्याकडे रवाना

0
Maratha Aarkshan:मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; CM एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन उदय सामंत जालन्याकडे रवाना

मराठा आरक्षणाचे आंदोलन अजूनही सुरूच असून गेल्या १५ दिवसांपासून ते सुरू आहे. जालन्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरंगे पाटील हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. आरक्षणाबाबत नवीन नियम होईपर्यंत थांबणार नसल्याचे जरंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा विरोध अधिक तीव्र होण्याची भीती लोकांना वाटत आहे.

सरकारने महिनाभरात आरक्षण न दिल्यास मोठा प्रश्न निर्माण होईल. तुमच्या मुलांना संधी मिळेपर्यंत मी इथेच राहीन. स्वतःला थोडा वेळ द्यावा लागेल. नाही तर हे लोक तुम्हाला त्रास देतील. आरक्षण मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही, असे जरंगे यांनी सांगितले.

  • आम्ही आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला 40 वर्षे दिली. आता 1 महिना द्यायला काय हरकत आहे. एक महिना दिला तर आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असेल, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
  • मराठा समाजाने सरकारला वेळ दिला तरी मी आंदोलन थांबवणार नाही. माझे उपोषण असेच सुरू राहील. आरक्षण मिळेपर्यंत मी ही जागा सोडणार नाही. मी फार जिद्दी आहे. मला मराठ्यांना कोणत्याही स्थितीत आरक्षण मिळवून द्यायचे आहे, असे जरांगे म्हणाले.
  • एक महिन्याने फरक पडणार नाही, पण सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे का? असा सवाल जरांगे पाटील यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
  • आरक्षणाची लढाई लहान नाही. पण ती मराठवाड्याने अंतिम टप्प्यात आणली. एका दिवसात जीआर काढला तर त्याला आव्हान देता येऊ शकते.
  • मला माझ्या समाजाचे वाटोळे करायचे नाही. आम्हाला एक-दोन वर्षांचे नाही तर कायमस्वरुपी आरक्षण हवे आहे. एका महिन्याची मुदत दिली तर आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असेल. मी द्विधा मनस्थितीत सापडलो, आता समाजानेच काय करायचे ते सांगावे.
  • मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रथमच सर्वपक्षीय बैठक झाली. सर्व पक्ष एकत्र आले. सरकारने आम्हाला टिकणारे आरक्षण देण्याची हमी दिली. आम्ही आरक्षण देतो, 1 महिना द्या, असे त्यांचे मत आहे. आता सरकारला वेळ द्यायचा की नाही हे आपल्याला ठरवायचे आहे.
  • एक महिन्याने फरक पडणार नाही, पण सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे का? असा सवाल जरांगे पाटील यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
  • आरक्षणाची लढाई लहान नाही. पण ती मराठवाड्याने अंतिम टप्प्यात आणली. एका दिवसात जीआर काढला तर त्याला आव्हान देता येऊ शकते.
  • गाड्या अडवल्याने आरक्षण मिळणार नाही. सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाच्या बाजूने ठराव झाला. पण आरक्षणाचे पत्र हाती पडेपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही.
  • मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रथमच सर्वपक्षीय बैठक झाली. सर्व पक्ष एकत्र आले. सरकारने आम्हाला टिकणारे आरक्षण देण्याची हमी दिली, असे जरांगे म्हणाले.
  • सरकारने आमच्या मागणीसंबंधी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे आंदोलन थांबणार नाही. मी समाजासाठी पारदर्शकपणे काम करत आहे.
  • सरकारच्या 2 बैठका झाल्या. पण कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. मूळ प्रश्न तसाच राहिला आहे. महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
  • मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी दुपारी 2 वा. आंदोलक व पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपली म्हणजे मराठा समाजाची ताकद असल्यामुळे सरकार आपल्यापुढे झुकल्याचे स्पष्ट केले.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालन्याच्या दिशेने रवाना झालेत. अर्जुन खोतकर व मंत्री संदिपान भुमरे यांच्यानंतर आता सामंत मध्यस्थीसाठी मैदानात उतरलेत.
  • बुलेट ट्रेनच्या कामासाठी आज BKC मधील काही मार्ग आज बंद राहाणार आहेत. डायमंड जंक्शन ते जेएसडबल्यू कार्यालय, रोड प्लॅटीना जंक्शन ते ड्रेड सेंटर दरम्यान वाहतूक बंद असणार आहे.
  • सरकारने त्यांना वेळ कशासाठी हवा, याचे योग्य कारण दिले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिले तर आपण दोन पावले मागे येण्यास तयार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आरक्षण खरेच देणार का? याचे उत्तर मात्र, मिळायला हवे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 
  • मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपले आमरण उपोषण न सोडण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्यांनी रविवारपासून पाणी पिणे व सलाईनद्वारे उपचार घेणेही सोडले होते. पण सोमवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती ढासळली अन् आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांची चलबिचल सुरू झाली. अखेर एका 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन आलेल्या एका महिलेकडे पाहून जरांगेंचे मन द्रवले आणि त्यांनी स्वतःला सलाईन टोचून घेतली. 
  • नांदेडच्या शंकर नगर येथे शेतकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
  • वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
  • मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम ते कसबा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.
  • ‘शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावच्या पाचोऱ्यात पोहोचले. कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत. शिंदे व अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी.
  • मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आपला लढा आणखी तीव्र करत सरकारला नमते घेण्यास भाग पाडण्याचा इशारा दिला. मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र हाती पडेल, त्याच दिवशी मी माघार घेईल. तोपर्यंत नाही. मी ताणून धरले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने निवांत घरी झोपावे. हे आंदोलन रात्रीतून बंद होईल आदी चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे ते म्हणालेत. 
  • जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील नागरिकांनी सामूहिक फाशी आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
  • मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या बार्शीतील वैशाली आवारे यांची प्रकृती मंगळवारी खालावली. त्या गत 3 दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच डॉक्टरांच्या एका पथकाने उपोषणस्थळी धाव घेतली.
  • शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांची आंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी भेट घेतली. त्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
  • आम्हाला मनोज जरांगे यांचे कौतुक वाटते. त्यात त्यांचा विजय होईल. पण त्यांनी उपोषण थांबवले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार ही विश्वासाची माणसे आहेत. ते तुमची मागणी पूर्ण करतील. ते तुमची फसवणूक करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्या, असे संभाजी भिडे उपोषणकर्त्या जरांगे यांना म्हणाले.
  • मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर झाला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, असा विश्वासही संभाजी भिडे यांनी यावेळी व्यक्त केला.
  • आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटलांच्यासोबत आहोत. त्यांच्यासोबत लाखो लोकांची ताकद आहे. सरकार हा शब्द पाळणार असल्याचा शब्द मी तुम्हाला देतो, असेही भिडे यावेळी म्हणाले.
  • अर्जुन खोतकर व संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वातील सरकारच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुन्हा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांनी जरांगे यांना चर्चेतून तोडगा काढण्याची विनंती करत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here