मुंबई | शासननामा न्यूज ऑनलाईन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात केलेल्या दाव्यानंतर निवडणूक आयोग आता ६ ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वक्तव्यांमध्ये ट्विस्ट आला आहे. अजित पवार यांचा गट सत्तेत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. तरीही राष्ट्रवादीत फूट नसल्याचे दोन्ही गटांचे म्हणणे आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षात फूट नसल्याचे सांगतात आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळही मतविभागणी नसल्याचे सांगतात.
पक्षात फूट नसल्याचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे म्हणणे आहे. मग राष्ट्रवादीत नेमकं काय झालं? अर्थात, कायदेशीर बाजू भक्कम ठेवण्यासाठी जयंतराव असोत की भुजबळ, दोन्ही नेत्यांनी गुगली करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतची पहिली सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगात होणार आहे. आयोगाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाला नोटीस बजावली आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे कोणाला मिळणार आणि घड्याळाचे चिन्ह कोणाला मिळणार? दोन्ही बाजूंनी चर्चा होईल