पुणे | शासननामा न्यूज ऑनलाईन
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली. स्वत:ला ‘खोटं बोलणाऱ्या लांडग्याचं पिल्लू’ म्हणत टीका होऊनही अजित पवार काहीच बोलले नाहीत. मात्र आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, अर्वाच्य शब्दांचा वापर केला आहे. “अजित दादांनी पडळकरांना हतबलतेने उत्तर दिले नाही. त्यामुळे हे असहायांचे अपत्य आहे”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या वरून बोलताना गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका केली. त्याचे पडसाद आंदोलनातून उमटलेही. मात्र स्वत: अजित पवारांची काही प्रतिक्रिया आलेली नाही. ना पडळकर आपल्या टीकेवरुन मागे हटले.