मुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जीएसटी विभागाच्या कारवाईनंतर अडचणीत आला आहे. मात्र, आता धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा साखर कारखाना वाचवण्याकडे झुकले आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारखान्याच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी स्वतः पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली