पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
महाराष्ट्रात भाजपचे मिशन 45 सुरू असताना पुणे जिल्ह्यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा दौरा वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते.त्यानंतर गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही पुण्यात आले होते. नुकतीच संघाची राष्ट्रीय बैठक पुणे शहरात पार पडली. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा पुणे दौरा निश्चित झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचवेळी चांदणी चौक पुलाचे लोकर्पण करण्याची चर्चा सुरु होती. परंतु पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने ते झाला नाही. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत चांदणी चौक पुलाचे लोकर्पण झाले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन महिन्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पुणे शहरात येत आहे.
पुणे येथील लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी येत्या पाच ऑक्टोबर रोजी मोदी पुण्यात येत आहे. पुणे विमानतळावरील विस्तारीत नवीन टर्मिनल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता हे टर्मिनल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला