[ad_1]
pakistani american zahid quraishi : अमेरिकन सिनेटने न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात पाकिस्तानी-अमेरिकन वंशाचे जाहिद कुरेशी यांच्या ऐतिहासिक नियुक्तीस मान्यता दिली आहे. मंजुरीनंतर जाहिद कुरेशी अमेरिकेच्या इतिहासातील पहिले मुस्लिम फेडरल जज बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी झालेल्या मतदानात 46 वर्षीय जाहिद यांच्या बाजूने 86, तर 16 जणांनी विरोधात मतदान केले. कुरेशी सध्या न्यू जर्सी जिल्ह्यात मॅजिस्ट्रेट जज म्हणून काम पाहत आहेत. परंतु न्यू जर्सीच्या अमेरिकेच्या जिल्हा कोर्टाचे जज म्हणून त्यांनी शपथ घेतातच एक नवा इतिहास लिहिला जाईल. pakistani american zahid quraishi Became first muslim to be a federal judge US senate confirms
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकन सिनेटने न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात पाकिस्तानी-अमेरिकन वंशाचे जाहिद कुरेशी यांच्या ऐतिहासिक नियुक्तीस मान्यता दिली आहे. मंजुरीनंतर जाहिद कुरेशी अमेरिकेच्या इतिहासातील पहिले मुस्लिम फेडरल जज बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी झालेल्या मतदानात 46 वर्षीय जाहिद यांच्या बाजूने 86, तर 16 जणांनी विरोधात मतदान केले. कुरेशी सध्या न्यू जर्सी जिल्ह्यात मॅजिस्ट्रेट जज म्हणून काम पाहत आहेत. परंतु न्यू जर्सीच्या अमेरिकेच्या जिल्हा कोर्टाचे जज म्हणून त्यांनी शपथ घेतातच एक नवा इतिहास लिहिला जाईल.
अमेरिकेत पहिले मुस्लिम फेडरल जज
2019 मध्ये, न्यू जर्सी जिल्ह्यासाठी मॅजिस्ट्रेट जज म्हणून कुरेशी हे पहिले आशियाई अमेरिकन बनले. सिनेटचे सदस्य रॉबर्ट मेनडेझ मत देण्यापूर्वी भाषणात म्हणाले, “न्यायाधीश कुरेशी यांनी आपली कारकीर्द आपल्या देशाची सेवा करण्यासाठी समर्पित केली आहे, आम्ही त्यांच्याकडून शिकले पाहिजे कारण ही एक कहाणी आहे जी फक्त अमेरिकेत शक्य आहे.”
कोण आहेत जज जाहिद कुरेशी?
जाहिद कुरेशींचा जन्म न्यूयॉर्क शहरात पाकिस्तानी कुटुंबात झाला होता. 9/११ च्या हल्ल्यानंतर त्यांची अमेरिकन सैन्यात भरती झाली. ते दोनदा इराकमये गेले. 2019 मध्ये न्यू जर्सी जिल्ह्यासाठी ते पहिले आशियाई-अमेरिकन मॅजिस्ट्रेट जज बनले तेव्हा सर्व चकित झाले होते. कुरेशी यांचे वडील निसार यांनी शेवटच्या श्वासापर्यंत डॉक्टर म्हणून सेवा बजावली. गेल्या वर्षी वयाच्या 73व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले.
pakistani american zahid quraishi Became first muslim to be a federal judge US senate confirms
महत्त्वाच्या बातम्या
[ad_2]
Source link