
पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
पुण्यात गणरायाच्या आगमनासोबत (With the arrival of Ganaraya in Pune) पावसाला सुरुवात झाली होती. गेल्या आठ दहा दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरण भरण्याचा मार्गावर असल्यामुळे या धरणातून आजपासून रोज पाण्याचा विसर्ग होणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण महत्वाचे आहे. या धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांत चांगला पाऊस झाला. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरण यामुळे फुल्ल झाले आहे.
पुणे शहर आणि घाटमाथ्यावर गेल्या आठवडाभर चांगला पाऊस झाला. तसेच पुणे शहरात शुक्रवारी दमदार पाऊस झाला. एका दिवसात पुणे शहरात बारा मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक जलसाठा झाला. पुणेकरांची पावसाची चिंता मिटली आहे. पानशेत, वरसगाव धरण फुल्ल झाले आहे तर खडकवासला धरणही फुल्ल होण्याचा मार्गावर आहे.
कोणत्या धरणात किती जलसाठा (How much water storage in which dam in Pune?)
खडकवासला – 1.86 TMC
पानशेत – 10.65 TMC
वरसगाव – 12.82TMC
टेमघर- 2.91 TMC
एकूण पाणीसाठा -28.23TMC