Home महाराष्ट्र मराठवाडा Children Death in Nanded : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचाही समावेश

Children Death in Nanded : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचाही समावेश

0
Children Death in Nanded : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचाही समावेश

नांदेड | शासननामा न्यूज ऑनलाईन

हाफकीननं औषधी (Lack of Hafkeen Medicines) खरेदी बंद केल्यामुळं राज्यभरातील शासकीय रुग्णालयात (Patients die in Nanded Hospital) औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवतोय.

जिल्ह्यात तब्बल बारा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा जास्तीचा समावेश होता, असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळं नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या घटनेबद्दल डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, नांदेड येथील अधिष्ठता एस. आर. वाकोडे यांनी माहिती दिली आहे. तसेच औषधांची कमतरता असल्यानं सध्या रुग्णांवरच औषधांचा भार पडत असल्याची प्रतिक्रिया सामान्य रुग्णालयातील नातेवाईकांनी दिली आहे.

नांदेड भागात 70 ते 80 किमीच्या परिसरात एवढं मोठं रुग्णालय नाही. त्यामुळं रुग्ण आमच्या रुग्णालयात भरती होतात. सध्या येथे 12 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळं मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र, रुग्णसेवेवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. औषधांची खरेदी होऊ न शकल्यानं अडचण निर्माण झाली आहे – एस. आर. वाकोडे, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, नांदेड

रुग्णालयात कर्मचारी, डॉक्टर, नर्सची कमतरता आहे. अशातच रुग्णालयात इतर जिल्ह्यातून व तेलंगाणा राज्यातून देखील अनेक रुग्ण दाखल होतात. त्यामुळं कर्मचारी सेवेवरील ताण वाढून रुग्णांची अवहेलना होते. या रुग्णालयात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच औषधांची कमतरता व डॉक्टरांचे पुरेसे मनुष्यबळ नसल्यानं रुग्णसेवा ही खंडित पडत आहे. मागील 24 तासात बारा नवजात बालके यात सहा मुली व सहा मुले यांचा मृत्यू झालाय. तसेच इतर गंभीर आजार सर्पदंश व इतर आजारानं बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here