Home महाराष्ट्र शिवसेनेची अमानुष दादागीरी ! नालेसफाई कंत्राटदारावर नाल्यातील घाण ; शिवसेना आमदार दिलीप लांडेंचा प्रताप ; नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच काय?

शिवसेनेची अमानुष दादागीरी ! नालेसफाई कंत्राटदारावर नाल्यातील घाण ; शिवसेना आमदार दिलीप लांडेंचा प्रताप ; नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच काय?

0
शिवसेनेची अमानुष दादागीरी ! नालेसफाई कंत्राटदारावर नाल्यातील घाण ; शिवसेना आमदार दिलीप लांडेंचा प्रताप ; नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच काय?

मुंबई: मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्यानंतर नालेसफाईवरुन जोरदार गोंधळ सुरू होतो . राजकारण देखील तापतं .आता यंदा तर गेल्या ४ दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. आजही शहरातील अनेक भागांमध्ये नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही. चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या अंगावर कचरा टाकत त्यांना अमानुष वागणूक दिली . Shiv Sena’s inhuman behavior! Nala dirt on contractor; by Shiv Sena MLA Dilip Lande; What about the corrupt leaders in BMC

या नालेसफाईचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याला त्या ठिकाणी बोलावून आमदारांनी चक्क त्याच नाल्याच्या कचऱ्यात बसवले. जनतेचा त्रास त्याला कळवा म्हणून असे केल्याचे ते यावेळी सांगत होते. मात्र यामुळे एकीकडे महापौर संपूर्ण नालेसफाई झाल्याचे सांगत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आमदरानेच कंत्राटदाराला नाल्याच्या तुंबलेल्या कचऱ्यात बसवले.

चांदीवली भागातील अनेक ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. ज्यामुळे गेल्या ४ दिवसांत या भागात पाणी साचलं. त्यामुळे संतापलेल्या दिलीप लांडे यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन कंत्राटदाराच्या माणसाला रस्त्यावर बसवून त्याच्या अंगावर कचरा टाकला.

आमदार लांडे यांचा हा प्रताप सोशल मीडियावर नंतर चांगलाच व्हायरल होतो आहे.राज्यात शिवसेना महापालिकेत सत्ताधारी शिवसेनाच मग कंत्राट देणार्या नेत्यांच काय? त्यांना देखील असेच कचर्यात बसवणार का?असा संताप व्यक्त केला जात आहे.

मी या मतदार संघाचा आमदार आहे. नालेसफाईची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ती लोकं इथे येत नाहीत. लोकांनी विश्वास ठेवून मला आमदार म्हणून निवडून दिलंय. नालेसफाईचं कंत्राट ठेकेदाराला देण्यात आलंय, पण त्याने आपलं काम केलं नाही म्हणून मला रस्त्यावर उतरुन गटार साफ करावं लागतंय. माझ्या मतदार संघातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जो त्रास माझ्या मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागला तो त्रास कंत्राटदाराला झाला पाहिजे म्हणून मी हे काम केल्याचं आमदार दिलीप लांडेंनी सांगितलं.

Shiv Sena’s inhuman behavior! Nala dirt on contractor; by Shiv Sena MLA Dilip Lande; What about the corrupt leaders in BMC

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here