Home महाराष्ट्र ramdas athawale on prashant kishor-sharad pawar: Ramdas Athawale: ‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…’; ‘कवी’ आठवले पवारांना म्हणाले…

ramdas athawale on prashant kishor-sharad pawar: Ramdas Athawale: ‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…’; ‘कवी’ आठवले पवारांना म्हणाले…

0
ramdas athawale on prashant kishor-sharad pawar: Ramdas Athawale: ‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…’; ‘कवी’ आठवले पवारांना म्हणाले…

मुंबई: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या घरी किशोर यांच्यासाठी खास जेवणाचा बेतही आखण्यात आला होता. या आदरातीथ्याची सध्या देशभरात चर्चा सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत एक कविता रचत या भेटीवर टोलेबाजी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विरोधकांनी आघाडी केली तरी २०२४ मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ( Ramdas Athawale on Prashant Kishor-Sharad Pawar Meeting )

नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये मिळवलेल्या विजयात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यानंतर पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग, बिहारमध्ये नितीश कुमार, महाराष्ट्रात शिवसेनेसाठीही रणनीती आखण्याचे काम प्रशांत किशोर यांनी केले होते. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणनीतीकार म्हणून किशोर यांनी काम पाहिले आणि नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे आव्हान परतवून लावत ममतांना विजय मिळवून दिला. या साखळीतच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राष्ट्रीय राजकारणात लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या अनुषंगाने आज आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या स्टाइलमध्ये यावर कविता सादर केली.

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी;
२०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!
नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी;
मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?

आठवले यांनी या कवितेसोबच विरोधकांची आघाडी बनली तरी नरेंद्र मोदींना कोणीच रोखू शकणार नसल्याचा दावा केला. ‘शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली ही चांगली गोष्ट आहे. पवार साहेबांबद्दल आम्हाला आदरच आहे पण भाजप विरोधात सध्यातरी सगळे विरोधी पक्ष एकत्र येणे अशक्य आहे’, असे आठवले म्हणाले. विरोधक एकत्र आले तरी २०२४ मध्ये देशातील जनता मोदी यांनाच मतदान करणार आहे. त्यांनाच पुन्हा एकदा सत्तेवर आणण्याचा प्रयत्न जनतेचा असणार आहे, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर भाजपसोबत नव्हते. तरीसुद्धा भाजपने ३०३ जागा स्वबळावर निवडून आणल्या आणि दुसऱ्यादा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, याची आठवणही आठवले यांनी करून दिली. पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्यानंतर आपण आता अशाप्रकारे निवडणुकीत काम करणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरही त्यांनी ही व्यक्तिगत भेट होती, असे म्हटले आहे. त्यामुळे या भेटीचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही, असेही आठवले म्हणाले. विरोधकांना आघाडी करण्याचा अधिकार आहे पण देशातील सध्याची स्थितीही लक्षात घेणे गरजेचे आहे. गेल्या सात वर्षांत मोदींनी चांगले काम केले आहे. येत्या काळातही असेच काम ते करतील. त्यामुळे त्यांना आव्हान देणे सोपे नाही. जर काँग्रेसला ४०-४२ जागांच्या पुढे जाता येत नसेल तर इतर पक्षांना ते कसे शक्य होईल, असा सवालही आठवले यांनी केला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here