Home पुणे पुण्यातील 10 रुग्णालयांत महत्त्वाची आरोग्य योजना झाली बंद; महापालिकेनं घेतला निर्णय | Coronavirus-latest-news

पुण्यातील 10 रुग्णालयांत महत्त्वाची आरोग्य योजना झाली बंद; महापालिकेनं घेतला निर्णय | Coronavirus-latest-news

0
पुण्यातील 10 रुग्णालयांत महत्त्वाची आरोग्य योजना झाली बंद; महापालिकेनं घेतला निर्णय | Coronavirus-latest-news

[ad_1]

पुण्यातील 10 रुग्णालयांत महत्त्वाची आरोग्य योजना झाली बंद; महापालिकेनं घेतला निर्णय

पुणे शहरातील दहा बड्या रुग्णालयात सुरू असलेली महापालिकेची महत्त्वाची आरोग्य योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येथून पुढे अनेक शहरी गरीब कार्डधारकांना या योजनेंतर्गत संबंधित रुग्णालयांत उपचार घेता येणार नाहीत.

पुणे, 14 जून: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील बराच ताण कमी झाला आहे. अशात शहरातील दहा बड्या रुग्णालयात सुरू असलेली ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे अनेक शहरी गरीब कार्डधारकांना या योजनेंतर्गत संबंधित रुग्णालयांत उपचार घेता येणार नाही. हा निधी आता अन्य गरजू लाभार्थ्यांसाठी वळवण्यात येईल, असं स्पष्टीकरण महापालिकेकडून देण्यात आलं आहे.

खरंतर सध्या पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान शहरातील काही रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) या दोन्ही योजना लागू असल्याचं दिसून आलं आहे. पण शहरातील अनेक शहरी गरीब कार्डधारक लोकं या दोन योजनांसोबतचं महापालिकेच्या ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने’चा लाभ घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे एकच व्यक्ती अशा तीन प्रकारच्या योजनेचा लाभ घेत असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं.

त्यामुळे महापालिकेनं पुण्यातील 10 बड्या रुग्णालयातील ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतचं हा निधी अन्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल, असंही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानुसार अंशदायी वैद्यकीय साह्य योजना समितीने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा-पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 242 जणांनी म्युकरमायकोसीसवर केली मात; अद्याप भीती कायम

या 10 रुग्णालयांत बंद झाली ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’

एम्स रुग्णालय- औंध, गॅलॅक्सी रुग्णालय-कर्वे रस्ता, सह्याद्री सूर्या रुग्णालय- कसबा पेठ, भारती रुग्णालय -कात्रज, ग्लोबल रुग्णालय-दत्तवाडी, पवार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय-खराडी, देवयानी रुग्णालय-कोथरूड, ससून रुग्णालय-पुणे स्टेशन, श्री रुग्णालय-शास्त्रीनगर, राव रुग्णालय-बिबवेवाडी या रुग्णालयांमध्ये ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ बंद करण्यात आली आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 14, 2021, 9:06 AM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here