अभिनय क्षेत्रात येऊ घातलेल्या कित्येक नवोदितांसाठी ती एक आदर्श सौंदर्यवती म्हणून ओळखली जाते. आज आपण या लेखातून राय लक्ष्मीच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही देखील हि टिप वापरून नक्कीच तिच्या सारखे सौंदर्य मिळवू शकता आणि आपले नशीब देखील या फिल्म इंडस्ट्री मध्ये आजमावू शकता.
जबरदस्त परिवर्तन
राय लक्ष्मीच्या करियरच्या सुरुवातीचा लूक जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला दिसेल की आताची राय लक्ष्मी आणि तेव्हाची राय लक्ष्मी यांच्यात जमीन अस्मनाचे अंतर आहे. पूर्वी राय लक्ष्मी एवढी फिट आणि सेक्सी नाही दिसायची जेवढी आज दिसते. तिने स्वत:मध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी वेट लॉस वर जबरदस्त मेहनत घेतली आणि स्कीन ग्लो व बॉडी लेंग्वेजवर खूप काम केले. तिच्या त्या मेहनतीचा परिणाम म्हणून की काय आज ती तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी सिनेमासृष्टीत वेगाने घौडदौड करत आहे.
त्वचेचा ग्लो आहे सर्वोत्तम
राय लक्ष्मीचा हा फोटो पाहून तुम्ही देखील घायाळ झाला असाल यात शंकाच नाही. तिच्या या फोटोतील सौंदर्यात मुख्य टाकतो आहे तिच्या त्वचेचा ग्लो! तिला नैसर्गिक ग्लोचे वरदान लाभले आहे. तिचा हा फोटो म्हणजे नो-मेकअप लुक आहे. म्हणजेच या फोटोत तिने चेहऱ्यावर वा त्वचेवर कोणताही मेकअप अप्लाय केलेला नाही. आता जर नो-मेकअप लुक असा असेल तर जेव्हा राय लक्ष्मी मेकअप करून येत असेल तर किती सुंदर दिसत असेल?
परफेक्ट ब्राईड्समेड लुक
राय लक्ष्मीचा हा फोटो एका मेहंदी सेरेमनी मधील आहे. या कार्यक्रमात ती एवढी सुंदर दिसत होती म्हणे की तरुणांच्या आणि तरुणींच्या देखील तिच्यावरून नजर हटत नव्हत्या. अत्यंत सुंदर लेहंगा आणि सोबत ब्रा-कट ब्लाउज राय लक्ष्मी वर अगदी खुलून दिसत होता. या कार्यक्रमासाठी तिने मेकअपच्या नावाखाली फक्त काजळ, मस्कारा आणि आयलाईनरचाच वापर केला आहे. या शिवाय तिच्या लुकची सुंदरता वाढवली इयरिंग ज्वेलरीसेटने! अगदी सध्या पद्धतीने तयार होऊन देखील अनेकांना घायाळ करणाऱ्या सौंदर्यवतींमध्ये राय लक्ष्मीचा समावेश उगाचच केला जात नाही.
रियल रेडीएंट स्कीन
राय लक्ष्मीची स्कीन अत्यंत लाइट आणि रेडीएंट ग्लोची आहे, आपल्या त्वचेला हेल्दी आणि क्लीन ठेवण्यासाठी राय लक्ष्मी क्लिंजिंग-टोनिंग-मॉइश्चराइजेशन सह आपल्या डाएट वर देखील संपूर्ण लक्ष देते. वेगवेगळ्या वेळेला घेतेल्या गेलेल्या राय लक्ष्मीच्या या सेल्फी मध्ये तुम्ही पाहू शकता की कॅमेरा तिच्या त्वचेच्या जेवढ्या जवळ जातो आहे तेवढा तिच्या त्वचेवरचा ग्लो अधिक खुलून दिसतो आहे. नैसर्गिक ग्लोचे वरदान फार कमी स्त्रियांना लाभते आणि राय लक्ष्मी त्यापैकीच एक आहे.
रेड हॉट साडीवर लेसची बेल्ट
लालचुटूक साडी मध्ये राय लक्ष्मी खूपच हॉट दिसते आहे आणि तिची अदाकारी अजून क्युट दिसते आहे. प्लेन रेड साडी सोबत राय लक्ष्मीने डीप कट ब्लाऊज आणि लेसची बेल्ट परिधान केली आहे. मोकळ्या केसांमध्ये कोणत्याही साहित्याचा वापर केलेला नाही. हा या फोटोज मध्ये तुम्हाला राय लक्ष्मीच्या चेहऱ्यावर चेरी रेड लिपस्टिक नक्कीच नजरेस येईल. जी तिच्या खूपच कमी लुक्स मध्ये पाहायला मिळते. तिने या लुक मध्ये जास्त ज्वेलरीचा देखील वापर केलेला नाही परंतु तरी तिच्या सौंदर्यात कोणतीच कमतरता दिसत नाही आहे. याचे श्रेय देखील तिच्या हेल्दी स्कीनलाच जाते.
सुंदरतेचे रहस्य
आपल्या हर लुक मध्ये कमीत कमी मेकअपचा वापर करून जास्तीत जास्त सुंदर दिसण्यासाठी राय लक्ष्मी खूप प्रसिद्ध आहे. याबाबतीत ती अगदी निष्णात आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. या बद्दल सांगताना ती स्वत: म्हणते की आपल्या हेवी स्कीन वर मेकअप बेसच्या जागी मी अत्यंत लाईट प्राईमर वापरते, हे माझ्या स्कीनला मॉइश्चराइज तर करते पण माझ्या मेकअपला फिक्स करण्याचे काम देखील करते.
पारंपारिक आणि ग्लॅमरस लूकची सांगड
सिल्क प्लेन ब्लाउज आणि जांभळ्या-गुलाबी रंगाच्या एम्ब्रोडरी केलेल्या साडीमध्ये राय लक्ष्मी एकदम देसी ग्लॅमरस बाहुली दिसते आहे. मॅसी ओपन हेअरमध्ये रॉ-कर्लसह तिचे केस तिच्या लूकमधील बोल्डनेस वाढवत आहेत. तर डोळ्यांतील गडद काजळ मिस्टीरियस टचमध्ये भर घालत आहे. बेबी पिंक ओठांवरील सेल्फी प्रोन स्मितहास्य गोंडस दिसत आहे. पारंपारिक आणि मार्डन अशी कोणतीही पद्धत पसंत करणा-या मुलीला राय लक्ष्मीचा हा लूक खूपच आवडू शकतो.