Home पुणे ‘हे खरे जंटलमॅन’, उदयनराजेंच्या टोलेबाजीने संभाजीराजेंना पत्रकार परिषदेत फुटले हसू!

‘हे खरे जंटलमॅन’, उदयनराजेंच्या टोलेबाजीने संभाजीराजेंना पत्रकार परिषदेत फुटले हसू!

0
‘हे खरे जंटलमॅन’, उदयनराजेंच्या टोलेबाजीने संभाजीराजेंना पत्रकार परिषदेत फुटले हसू!

पुणे, 14 जून : साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)आणि संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची आज पुण्यात (Pune) भेट झाली. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी  ठाकरे सरकार जोरदार टीकास्त्र सोडलं. तसंच, ‘राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले. हे जंटलमॅन माणूस आहे, हे काही बोलणार नाही, पण कुणाला कुठे गाठायचं हे मला माहिती आहे’ असं म्हणताच संभाजीराजेंना हसू फुटले.

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावर खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर उदयनराजे यांनी 16 तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

‘राज्य सरकारला आधी विशेष अधिवेशन ठरवू द्या, मग काय रुपरेषा ठरवायची आहे, कुणाला कुठे गाठायचं आहे, हे मला चांगलं माहिती आहे. संभाजीराजे काही बोलणार नाही, ते जंटलमॅन माणूस आहे, ते खरेच जंटलमॅन आहे, असं म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हश्शा पिकली, संभाजीराजेही खळखळून हसले.

चंद्रकांत पाटलांना इशारा

भाजपचे नेते संभाजीराजे यांच्यावर टीका करत असतात, असा सवाल विचारला असता उदयनराजे म्हणाले की, ‘टीका करणे असेल तर तो त्यांचा विचार आहे. हाताची बोटं ही सारखी नसता. माझ्या विधानाशी तुम्ही सहमत असावे, असं माझं म्हणणं नाही. मी जे काही बोललो ते भाजपला सुद्धा लागू आहे, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.

‘ही राज्य सरकारची जबाबदारी’

‘ही केंद्राची जबाबदारी नाही, तर राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. विशेष अधिवेशन बोलावून एकदा काय ती चर्चा होऊ द्या, सभागृहात ही लोकं एक बोलता आणि बाहेर भलतंच बोलता. त्यामुळे या सरकारने आधी निर्णय घेऊन दाखवावा, नंतर केंद्रासोबत काय बोलायचं आहे ते मी पाहिल’ असंही उदयनराजे म्हणाले.

‘लोकप्रतिधिनींना जाब विचारला पाहिजे’

‘जेवढे राज्यकर्ते आहे ना आजपर्यंत त्यांना खूप मुभा दिली आहे. आपण निवडून आलो आहे, त्यांना खूप काही वाटतंय. आता या लोकशाहीतील या राजे म्हणून घेणाऱ्यांनी नीट वागले पाहिजे. माझं तर म्हणणं आहे, यांना गाडलं पाहिजे. वाटलं तर माझ्यापासून सुरुवात करा. माझ्याकडे जशी विचारणा करणार आहात, तसंच प्रत्येक आमदार आणि खासदाराला याचा जाब विचारला पाहिजे’ असंही उदयनराजे म्हणाले.

संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

‘आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे. संभाजीराजे यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. पण आमचा मार्ग हा एकच आहे’ असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here