[ad_1]
हायलाइट्स:
- शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.
- दोन्ही राजे एकत्र आले याचे स्वागत आहे, मात्र दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत- खासदार अरविंद सावंत
- त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबाबत ते बोलत नाहीत. ते मिठाला जागल्यासारखे बोलत आहेत- खासदार अरविंद सावंत
या वेळी खासदार अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवर देखील भाष्य केले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यघटनेनुसार निर्णय घेतला पाहिजे. मात्र यात केवळ राजकारण करण्याचे कामच सध्या सुरू आहे. यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे, असा आरोप खासदार सावंत यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोना: आजच्या रुग्णसंख्येत मोठी घट; ८,१२९ नवे रुग्ण, मृत्यू २००
‘राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी करा’
खासदार अरविंद सावंत यांनी राम मंदिर जमीन घोटाळ्यावर देखील भाष्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत आमच्या भावना स्पष्ट आहेत. धार्मिक भावनांशी खेळू नका, असे सांगत राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सावंत यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- दोन राजे एकत्र आले याचा आनंद, मात्र त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावेत: विजय वडेट्टीवार
‘मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन म्हाडाने करावे’
मुंबईतील मोडकळीस आलेल्या चाळींबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. मात्र असे असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून या कायद्याला मंजुरी मिळत नाही. म्हणूनच पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे, असे सावंत म्हणाले. राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे जर मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन होऊ शकत नसेल, तर म्हाडाने हे पुनर्वसन करावे, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण: समाजाचा उद्रेक झाल्यास जबाबदार कोण?; उदयनराजेंचा सवाल
[ad_2]
Source link