[ad_1]
तसंच जोडीदाराच्या एखाद्या गोष्टीमुळे दुखावल्या गेलेल्या काही मुली त्याला सर्वच ठिकाणी ब्लॉक करून अंतर ठेवत असल्याचंही पाहायला मिळतं. कधी-कधी आपला राग व्यक्त करण्यासाठी त्या ‘ब्लॉक’ अस्त्र उपसतात. पण बहुतांश जणी ब्लॉक केल्यानंतर मागे कधीही वळून पाहत नाहीत. यामागील कारणे देखील मोठी असू शकतात, या समस्यांकडे पुरुष सहसा दुर्लक्षच करतात. परिणामी त्यांना एकटेपणाचाही सामना करावा लागतो. दरम्यान, मुली मात्र तीक्ष्ण नजरेनं जोडीदाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. नात्यातील एखादी गंभीर समस्या लक्षात आल्यास कोणत्याही प्रकारे संवाद न साधताच त्या पार्टनरपासून कायमचं दूर जाण्याचा निर्णय घेतात. (फोटो सौजन्य- Indiatimes)
भांडणादरम्यान नको त्या शब्दांचा उल्लेख करणं
जोडप्यांमध्ये वाद – भांडणे होणं सामान्य बाब आहे. प्रत्येक जोडप्यामध्ये छोटे-मोठे वाद घडतच असतात. यादरम्यान जेव्हा एक पार्टनर वाद मिटवण्यासाठी फोनद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, पण प्रेयसीनं सर्वच ठिकाणी ब्लॉक केल्याचं त्याला कळतं. तेव्हा सारं काही वाईटरित्या बिघडू लागतं. सोशल मीडियाच्या या जगात कपल केवळ फोनवरच नव्हे तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. अशा परिस्थितीत जोडीदारास सर्वत्र ब्लॉक करणे म्हणजे नातं संपवण्यासारखंच आहे. मुली अतिशय भावनिक असतात. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचं मन दुखावलं जातं.
म्हणूनच भांडणादरम्यान चुकून पार्टनरने नको त्या शब्दाचा उल्लेख केल्यासही मुलींचं मन दुखावलं जातं. राग प्रत्येकालाच येतो, पण शब्दप्रयोग करताना प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. तुमच्या एखाद्या शब्दामुळे ती प्रचंड दुखावली गेल्यास, तुम्हाला सर्वत्र ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणं
दोन व्यक्तींनी स्वतःचे नाते फुलवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे फार महत्त्वाचे आहे. जोडीदाराने आपल्याला पुरेसा वेळ द्यावा, स्पेशल ट्रीटमेंट द्यावी, कॉल-मेसेज करून विचारपूस करावी, अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. पण या सर्व गोष्टी जेव्हा अति प्रमाणात होऊ लागतात, त्यावेळेस मुलींची चिडचिड होणे स्वाभाविकच आहे. मुली नेहमीच करिअरसोबतच प्रेमाच्या नात्यावरही लक्ष केंद्रित करतात. पण करिअरच्या बाबतीत तडजोड करणं त्यांना अजिबात पसंत नसते.
म्हणूनच ऑफिसच्या कामादरम्यान त्रास दिल्यास त्यांची चिडचिड अधिक होते तसंच खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणं सुद्धा त्यांना आवडत नाही. परिणामी मुलींकडून जोडीदाराला ब्लॉक केलं जातं. म्हणूनच जोडीदाराच्या खासगी आयुष्यात जास्त प्रमाणात लुडबुड करणं सुद्धा योग्य नव्हे. प्रेमाव्यतिरिक्त आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात बरेच काही घडू शकते.
जोडीदार विश्वासघात करत असल्याची माहिती मिळणे
प्रेयसी किंवा पत्नीपासून कोणतीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करू नये, कारण नंतर त्यांना सगळंच कळतं. जर आपण आपल्या जोडीदाराकडे एखाद्या गोष्टीबाबत मोठं खोटे बोलत असाल किंवा त्यांची फसवणूक करत असाल तर त्यांना काहीही कळणार नाही, या भ्रमात चुकूनही राहू नका. कारण सत्य उघडकीस येतेच. तुम्ही केलेल्या चुकीवर बोलणं त्यांच्याकडून टाळलं जातं, पण ती गोष्ट त्यांच्या डोक्यातून कधीही जात नाही.
विश्वासघात सहन करणं कोणासाठीही सोपे नसते. कोणतेही नाते दीर्घकाळ टिकवून ठेवायचं असेल तर विश्वास मजबूत असणं आवश्यक आहे.
वेळीच व्हा सावध!
विश्वासच नसेल तर नाते कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत बर्याच वेळा मुली काहीही न बोलता ब्रेकअप करतात. यानंतर जोडीदाराला ब्लॉक करण्याचं पहिलं पाऊल त्यांच्याकडून उचललं जातं. एका संशोधनातील माहितीनुसार, केलेल्या चुकीमुळे तुम्हाला पश्चाताप व्हावा तसंच चूक लक्षात सुद्धा यावी, यासाठी मुली जोडीदाराला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतात.
प्रेमाच्या नात्यामध्ये विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. अशा परिस्थितीत आपल्या जोडीदारानं एखाद्या प्रकारची शंका तुमच्याकडे व्यक्त केली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. अन्यथा तुमचे नाते लवकरच संपुष्टात येऊ शकते.
(‘बालिका वधू’ फेम अविकाने रिलेशनशिपबाबत सांगितली मोठी गोष्ट, ‘त्याच्यामुळे मानसिक आधार मिळाला’)
एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा
[ad_2]
Source link