[ad_1]
हायलाइट्स:
- बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची मुंबई उच्च न्यायालयात धाव
- कंगनाच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
- कंगनाला हायकोर्टानं फटकारले
कंगनानं पारपत्र प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत पासपोर्ट नुतनीकरण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. मात्र, कंगनानं पासपोर्ट नुतनीकरण करण्यास कार्यालयाने नकार दिल्याचे अर्जात म्हटलं असलं तरी त्याविषयीच्या कोणत्याच आदेशाची प्रत जोडलेली नाही. त्यामुळं मुंबई हायकोर्टात अर्ज करण्याचा अधिकार नाही, अशी माहिती तक्रारदार अॅड रिझवान मर्चट यांनी हायकोर्टाला दिली आहे. मात्र, आम्ही पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलं असा दावा कंगनाचे वकिल रिझवान सिद्दिकी यांनी केला आहे.
कंगनाच्या परदेशवारीला ब्रेक?; पासपोर्ट नुतनीकरणासाठी हायकोर्टात धाव
‘पासपोर्ट ऑथॉरिटीलाही तुम्ही अर्जात प्रतिवादी केलेले नाही. कोणाचेही नाव नाही. मग हायकोर्ट आदेश कसा करू शकते?, असा सवाल खंडपीठानं कंगनाच्या वकिलांना केला आहे. तसंच, पासपोर्ट नूतनीकरणाच्या संदर्भात राज्य सरकारला आणि पोलिसांना अर्जात प्रतिवादी करण्यात काय अर्थ आहे? अर्जात सुधारणा करून पासपोर्ट ऑथॉरिटीला प्रतिवादी करणार असाल तर पुढील सुनावणी घेऊ, असं खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. पासपोर्ट ऑथॉरिटीला प्रतिवादी करून अर्जात सुधारणा करा, त्यानंतर २५ जूनला सुनावणी घेऊ,’ असे आदेश खंडपीठाने केले आहे.
‘कंगनाला परदेशात काही व्यावसायिक कामांनिमित्त जायचे आहे. तिचे समजू शकतो. पण रंगोली चंडेल यांचे नाव अर्जात का लिहिले आहे. त्यांना परदेशात परफॉर्मन्स वगैरेचे कोणतेही काम नाही मग रंगोलीचे नाव अर्जात कशासाठी?,’ असा खडा सवाल कोर्टानं केला आहे.
वाचाः एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट; मराठी अभिनेत्याला अटक
‘चित्रपटाच्या चित्रिकरणाचे काम परदेशात होत आहे. त्याविषयीचे इतर कलाकार व अन्य कर्मचारी वर्ग आधीच पोचला आहे. त्यामुळे लवकरची तारीख द्यावी’, अशी विनंती कंगनाचे वकिल सिद्दिकी न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळली आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी नव्या तारखा ठरवल्या जाऊ शकतात आणि जर इतकी घाई होती तर कंगनाने आधीच सजग राहून हायकोर्टात अर्ज का केला नाही? आणि असा अस्पष्ट स्वरुपाचा अर्ज का केला आहे?,’ असं म्हणत खंडपीठाने फटकारले आहे.
[ad_2]
Source link