मुंबई, १५ जून: यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी (Ashadi Wari) सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू (Dehu) व आळंदी (Aalandi) येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 (100 warkari) तर उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना (50 warkari) प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर (Guidelines for Ashadi Wari) करण्यात आली आहे.
काय आहे नियमावली?
यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-19 (Covid-19) च्या प्रतिबंधासाठी केंद्र (Central Government) आणि राज्य शासनाने (Maharashtra Government) वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी (Wakhari) येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूर (Pandharpur)कडे 1.5 किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.