मराठमोळ्या वेशात महिला डॉक्टरने जिममध्ये वर्कआऊट केलं आहे.
पुणे, 15 जून : राज्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. यानंतर पॉझिटिव्ही रेटनुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवला जातो आहे. त्यानुसार पुणेकरांना काही प्रमाणात मोकळा श्वास घेता येतो आहे. पुण्यात काही निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यानुसारच जीम सुरू झाली आहे आणि यानंतर पुण्याच्या एका महिलेला इतका आनंद झाला की तिनं जीममध्ये जाऊन साडीतच वर्कआऊट (Pune woman workout in saree) केलं आहे. तेसुद्धा झिंगाट गाण्यावर (Pune woman workout on zingaat song) .
लॉकडाऊन मुक्तता होताच अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यापैकीच एक आहे पुण्यातील डॉक्टनर शर्वरी इनामदार. नियमितपणे वर्कआऊट करतात. कोरोना ल़ॉकडाऊनमुळे त्यांना जीममध्ये जाता येत नव्हतं. घरीच वर्कआऊट करावं लागत होतं. पण आता लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आणि त्या सर्वात आधी जीममध्ये गेल्या.
जीम म्हटलं जीमचे खास कपडे असतात. पण या डॉक्टरबाईंनी साडी नेसूनच जीममध्ये वर्कआऊट केला आहे. नाकात नथ आणि सहावारी साडी नेसून डॉ. शर्वरी वर्कआऊट करताना दिसल्या. झिंगाट गाण्यावर त्यांनी वर्कआऊट केला आहे. यावरूनच जिम सुरू झाल्याचा त्यांना किती आनंद होतो आहे ते दिसतं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.