Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठा आरक्षण: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नक्षलवाद्यांना दिला ‘हा’ इशारा

मराठा आरक्षण: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नक्षलवाद्यांना दिला ‘हा’ इशारा

0
मराठा आरक्षण: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नक्षलवाद्यांना दिला ‘हा’ इशारा

पुणे: नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पत्रक काढून मराठा समाजातील तरुणांना क्रांतीकडे वळण्याचा सल्ला देणे, हे व्यवस्थेला आव्हान देणारे असल्याचे सांगत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नक्षलवाद्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. (Home Minister Dilip Walse Patil has warned the Naxals to take action)

वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वळसे-पाटील यांनी हे वक्तव्य केले. गडचिरोली येथून नक्षलवाद्यांकडून मराठा समाजाला पाठिंबा दर्शविणारे पत्रक काढण्यात आले आहे.

याबाबत वळसे-पाटील म्हणाले, ‘नक्षलवाद्यांनी मराठी आरक्षणाला पाठिंबा जाहीर करून मराठा समाजातील तरुणांना क्रांतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. नक्षलावादी हे लोकशाही व्यवस्थेला नाकारतात. त्यामुळे त्यांनी हे आवाहन करणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करणारे आहे. देशातील प्रश्न हे लोकशाही मार्गाने सोडविण्यात येतात. नक्षलवादी हे व्यवस्थेला धोका देत असून, मराठा आरक्षणाबाबतचे आवाहन हे त्याचाच एक भाग आहे’



‘विरोधक सामाजिक वातावरण बिघडवित आहेत’

नियामक मंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘राज्यातील सरकार हे प्रयत्न करूनही पडत नसल्याचे लक्षात आल्यावर विरोधकांना पोटदुखी झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विषयावरून विरोधक हे सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत’ असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.



ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार हे फार दिवस टिकणार नाही, असा विरोधकांचा अंदाज होता. मात्र, सरकार टिकले असून, भक्कमही असल्याचे लक्षात आल्याने मराठा आरक्षण, आषाढी वारी, ओबीसी आरक्षण या विषयांवरून विरोधक हे सरकारवर टीका करत आहेत. या प्रश्नांवरून आंदोलने होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र, सरकार हे आरक्षणाबाबत सकारात्मक आहे.’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here