Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा

बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा

0
बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा
ओतूर, 16 जून: पुणे (Pune) जिल्ह्यातील ओतून येथील एका तरुणावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला (leopard attack) केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तरुणानं बिबट्यासमोर हार न मानता, बिबट्याशी धाडसीपणानं लढा दिला आहे. प्रसंगावधानानं दिलेल्या लढ्यामुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला (Young man survives leopard attack) आहे. पण या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. बिबट्यानं तरुणाला तीसहून अधिक वेळा चावा (Leopard bites 30 times) घेतला आहे. या तरुणाला सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

निलेश ज्ञानेश्वर घुले असं हल्ला झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास तो आपल्या घराच्या पाठीमागील शेतात गेला होता. दरम्यान बिबट्यानं अचानक त्याच्यावर हल्ला केला. बिबट्यानं हल्ला केल्यानंतर निलेश घाबरून गेला. पण त्यानं धाडसीपणानं प्रतिहल्ला करत बिबट्याशी लढा दिला आहे. तसेच आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावलं आहे. या हल्ल्यातून निलेश बचावला असला तरी त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी बिबट्यानं चावा घेतला आहे.

निलेश याच्या अंगावर बिबट्यानं तब्बल 30 वेळा चावा घेऊनही निलेश सुखरूप बचावला आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय हल्ला परतवून लावल्यानंतरही वस्तीच्या आसपास कोणी नसल्यानं त्याला तात्काळ मदत मिळू शकली नाही. यानंतर जुन्नर येथील पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी येऊन निलेशला रुग्णालयात दाखल केलं. ओतूरच्या प्राथमिक केंद्रात उपचार केल्यानंतर, निलेशला बिबट्या दंशाची लस देण्यासाठी ससूनला हलवण्यात आलं आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात सध्या निलेशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. निलेशच्या उपचाराचा सर्व खर्च वन विभागाकडून करण्यात येईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. बिबट्यानं जीवघेणा हल्ला करूनही तरुणानं बिबट्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतल्यानं अनेकांना आश्चर्य आणि आनंद देखील झाला आहे.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here