पुणे: (प्रतिनिधी) | पुणे येथे मा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती, पुणे, शिरूर व मावळ लोकसभेकरिता महत्त्वाची बैठक पार पडली.
यावेळी डॉ महात्मे म्हटले की, केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्ही जनतेसमोर जात आहोत. धनगर समाजाचे प्रश्न आणि समस्या ही वेळोवेळी भाजपने सोडवली आहे. प्रलंबित प्रश्न हे भाजपचं सरकार सोडवू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या लोकसभेच्या अनुषंगाने बारामती, दौंड, इंदापूर तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी, शिरूर, आंबेगाव, या भागांमध्ये देखील धनगर समाजाच्या अनुषंगाने सभेचे आयोजन देखील करणार असल्याचे महात्मे यांनी सांगितले. मेळाव्यामध्ये विविध विकास कामाची आणि योजनांच्या माहिती जनतेपुढे घेऊन जावु असे मार्गदर्शन देखील यावेळी त्यांनी केले आहे.
यावेळी, सर्व समाज बांधवांच्या मते महायुतीच्या उमेदवारांस धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा आहे. असे समाज बांधवांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे संतोष महात्मे, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ देवकाते, भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ बाळासाहेब हरपळे, भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी, युवा मोर्चा चिटणीस सचिन जायभाय, भाजपा प्रदेश सदस्य सुधाकर राजे, डॉ अभय हाके, ध. स. संघर्ष समिती युवा अध्यक्ष अमन कुंडागीर, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस ओंकार डवरी, रुपेश आखाडे, दत्ता जाधव, सुर्या पाटील, सिद्धार्थ भोजने, रुपाली भोजने, गैरव गुंड, श्रीकांत वाघमोडे, नमो ग्रुपचे स्वाती कांबळे, रेश्मा भिडे, महिमा कांबळे व समाज बांधव उपस्थित होते.