Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune

कोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune

0
कोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune

पुणे, 16 जून: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आज कोल्हापूर येते संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक आंदोलन (Martha Kranti Muk Andolan) करण्यात आले. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

मराठा क्रांती मूक आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांची उद्या 17 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे.

कोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण दिलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती सदस्य आणि छत्रपती संभाजीराजे तसेच राज्य समन्वयक उपस्थित असणार आहेत. राज्य समन्वयक करणं गायकर, राजेंद्र कोंढरे, रगुनाथ चित्रे पाटील, अंकुश कदम, विनोद साबळे, रमेश केरे आदी समन्वय बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, सुपर न्यूमरी, वसतिगृह, ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती, कोपर्डी पीडितेला न्याय या राज्यसरकार कडील मागण्यांवर उद्याच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here