त्यामुळे त्यांच्या सौंदर्यामागच्या रहस्या बाबतचे प्रश्न अनेकांना पाडतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की केवळ त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्या जोरावर त्या अजूनही सुंदर नाहीत. त्यांच्या सौंदर्यामागचे रहस्य वेगळे आहे, ते रहस्य कळले की त्याचा वापर तुम्ही देखील करू शकता. चला तर जाणून घेऊया.
डेली स्कीन केअर रेजिम
जर तुम्हाला असे वाटत असेल की सुंदर अभिनेत्रींच्या यंग आणि ग्लोइंग स्कीनचे रहस्य केवळ महागड्या ट्रिटमेंट्स मध्येच दडले आहे तर नाही मंडळी तुम्ही चुकताय! कारण तुम्ही जसा विचार करताय तसे अजिबात नाही आहे. कारण या अभिनेत्री महागड्या ट्रिटमेंट ऐवजी घरगुती उपायांवरच जास्त भर देतात. त्यांना हेच उपचार करायला आवडतात, कारण यातून मिळणारे परिणाम हे अत्यंत प्रभावी असतात. म्हणूनच तर ऐश्वर्या राय बच्चन पासून शिल्पा शेट्टी पर्यंत सर्व अभिनेत्री घरच्या घरी बनवलेले स्कीन केअर मास्क आणि फेस पॅकच वापर करून आजही सुंदर दिसत आहेत.
फ्रुट फेस पॅक आहे खास
दही आणि बेसन सोबतच जास्त अभिनेत्री या आपल्या चेहऱ्यावर कोणत्या ना कोणत्या फळापासून तयार जोणारा फेस पॅक आवर्जून लावतात. जसे की ऐश्वर्या रायला एवाकाडो पासून तयार होणारा फेस पॅक लावायला आवडतो, तर माधुरी दीक्षित आणि प्रियांका चोप्राला मलई आणि बेसन चेहऱ्यावर लावायला आवडते. उपाय कोणताही असो तो ट्राय करून पाहिल्यावरच तुम्हाला फरक दिसेल. जो उपाय तुमच्या स्कीनला योग्य परिणाम देत असेल तो उपायच तुम्ही फॉलो केला पाहिजे.
स्कीन हायड्रेशन वर खास लक्ष
बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्री त्या घरी असोत किंवा शूटवर, नेहमी आपल्या स्कीन हायड्रेशन वर खास भर देतात. यासाठी त्या केवळ पुरेश्या प्रमाणात दिवसभर पाणीच पीत नाहीत तर आपल्या डायट मध्ये अधिकाधिक फ्लुइड घेणे सुद्धा पसंत करतात. जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही, कारण जेव्हा बॉडी मध्ये लिक्विडची कमतरता निर्माण हिते तेव्हा त्वचा आपली आर्द्रता हरवू लागते आणि स्कीनवर फाईनलाईन्स आणि डलनेस आक्रमण करू लागते.
किचनमध्ये दडले आहे सुंदरतेचे रहस्य
धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या सुंदरतेचे सिक्रेट्स तिच्या घराच्या किचन मध्ये दडलेले आहेत. केसांसाठी परफेक्ट हेअर ऑईल पासून ते स्कीन ग्लोइंग पॅक बनवेपर्यंत माधुरीच्या प्रत्येक ब्युटी प्रोब्लेमचे सोल्युशन तिच्या किचन मध्येच तिला मिळते. माधुरीला आपल्या चेहऱ्याची काळजी घरगुती उपायांसह घेणेच खूप जास्त आवडते. ती केमिकल युक्त ब्युटी प्रोडक्ट पासून शक्य तितकी दूर राहते. म्हणूनच मंडळी तुम्हाला देखील नैसर्गिक सुंदरता हवी असेल तर तुम्ही सुद्धा नैसर्गिक उपचार पद्धतीचीच कास धरायला हवी.
फिटनेसशी अजिबात तडजोड नाही
तुम्ही कधीतरी कंटाळून एक दिवस व्यायाम करणार नाही, पण बॉलीवूड अभिनेत्री मात्र कधीच चुकूनही आपल्या व्यायामाशी तडजोड करणार नाही. उलट त्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी देतात, जेणेकरून बॉडी फिट आणि फ्लेक्सिबल राहील. व्यायाम केल्याने फॅट बर्न होत नाही, कारण बॉडी मध्ये ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनचा स्तर वाढत असतो. शिवाय घाम येत असल्याने स्कीनच्या रोम मध्ये छिद्रांची सफाई होते. घामासह बॉडीचे टोक्सीन बाहेर येतात. या सर्वांसह व्यायाम केल्याने स्कीनचा ग्लो अजून वाढतो. म्हणूनच तुम्ही देखील व्यायामाकडे अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे.
लवचिकता आणि फिटनेस
कोणत्याही अभिनेत्रीसाठी सुंदर दिसण्याबरोबरच शरीराची लवचिकता आणि तंदुरुस्ती देखील खूप महत्वाची आहे. आता शिल्पा शेट्टीचेच उदाहरण घ्या. तिच्या त्वचेचा रंग डस्की आहे. सरळ शब्दांत सांगायचं तर शिल्पाचा रंग सावळा आहे. परंतु आपल्या त्वचेची योग्य काळजी घेऊन तिने नेहमीच त्याची चमक कायम ठेवली आहे. याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे बहुतेक मुलींना काळ्या रंगाचे वाईट वाटते. हा सर्व विचारांचा खेळ आहे. कारण सावळा रंग खूप सुंदर आणि निरोगी त्वचेचे लक्षण आहे.
फ्रुट्स व नारळ पाण्याचे न चुकता सेवन करतात
दररोज फळांचे सेवन करणे प्रत्येक अभिनेत्रीच्या डाएट चार्टचा एक भाग आहे. कारण फळे आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर देतात. त्वचेला तंदुरुस्त आणि चमकदार ठेवण्यासाठी फळांचे सेवन खूप उपयुक्त आहे. म्हणूनच प्रत्येक अभिनेत्री निश्चितपणे दररोज एकदा विशिष्ट प्रमाणात फळांचे सेवन करते. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बॉलिवूडमधील जवळपास सर्व अभिनेत्री नक्कीच रोज नारळाचे पाणी पितात. कारण नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्व ए, सी, डी तसेच शरीराला आवश्यक ती सर्व खनिजे असतात. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. म्हणजेच यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही, म्हणूनच ते आपली त्वचा आणि आपले शरीर नैसर्गिकरित्या सुशोभित करण्याचे कार्य करते.
जितकं शक्य तितकं क्लिन
बॉलिवूड अभिनेत्रीचा दैनंदिन आहारात तेल आणि फॅटच्या संतुलनासह जास्तीत जास्त स्वच्छतेची काळजी घेतली जाते. त्याचवेळी त्या सर्वजणी अधिकाधिक सेंद्रिय फळे, भाज्या आणि कडधान्यांचा वापर करतात. म्हणजेच एका शब्दात सांगायचे तर त्यांचे अन्न अधिकाधिक स्वच्छ असते. जे केमिकल फ्री, फॅट फ्री आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री देखील असते. असे अन्न खाल्ल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळते. यासह, आपल्या शरीराचा अनावश्यक विषारी घटकांच्या संपर्कात येण्यापासून बचाव होतो. म्हणूनच बॉलिवूड अभिनेत्रीचं फिटनेस आणि तारुण्याची चमक वर्षानुवर्षे टिकून राहते.