Home मनोरंजन थकव्यामुळे शरीरात राहिली नाही अजिबात ताकद? १० मिनिटांत थकवा दूर करतील ‘हे’ उपाय!

थकव्यामुळे शरीरात राहिली नाही अजिबात ताकद? १० मिनिटांत थकवा दूर करतील ‘हे’ उपाय!

0
थकव्यामुळे शरीरात राहिली नाही अजिबात ताकद? १० मिनिटांत थकवा दूर करतील ‘हे’ उपाय!
सध्या कामाचा ताण तणाव एवढा वाढला आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत काम करून करून व्यक्ती अगदी थकून जाते, दिवसभराचा थकवा चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसू लागतो, चेहऱ्यावरचा हा थकवा दूर करण्याच्या पद्धती तशा खूप आहेत, पण कामाच्या व्यापामुळे तुम्हाला स्वत:ची काळजी घेण्यास सुद्धा नीट वेळ मिळत नाही. पण काळजी करू नका यावर एक जालीम उपाय आम्ही घेऊन आलो आहोत. तो उपाय म्हणजे योग होय, तुमच्या चेहऱ्यावरून दूर झालेले तेज परत मिळवण्यात तुम्हाला योग मदत करेल.

काही अशा फेशियल एक्सरसाइज आहेत ज्या तुमचा थकवा तर दूर करतीलच पण सोबतच तुम्हाला काही मिनिटांमध्येच रिलेक्स करतील. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या फेशियल एक्सरसाइज ज्या तुम्ही तुमच्या कामाच्या मध्ये कधीही करू शकता आणि थकवा दूर पळवू शकता.

एक्सरसाईज 1

-1

ही एक्सरसाईज करण्याच्या आधी कामाच्या मध्ये 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. आता सर्वात आधी हाताच्या खालील भागाला आपल्या डोळ्यांजवळ ठेवा, तेथे ठेवा जेथे भुवया संपतात, आता वरच्या बाजूला हलका प्रेशर देऊन एक खोल श्वास घ्या. या दरम्यान तुम्ही जेवढा मोठा श्वास घ्याल तेवढे तुम्हाला रीलेक्स वाटू लागेल. ही एक्सरसाईज अनेक जाणकार सुद्धा करण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे काहीच वेळात फरक पडून खूप ताजेतवाने वाटू लागते.

एक्सरसाईज 2

-2

आपल्या नाकाच्या दोन्ही बाजूला तर्जनी आणि अंगठ्याने ग्रीप बनवा आणि स्कीन वर प्रेशर द्या, आपण ज्या प्रमाणे चिमटा काढतो अगदी त्याचप्रमाणे ही क्रिया करा. पण लक्षात घ्या हे अगदी हलक्या हाताने करायचे आहे, नाकाच्या खालच्या बाजूने सुरुवात करत भुवयांच्या टोकाला थांबा. या दरम्यान त्वचेला जास्त दाबू नका आणि नखे वाढली असतील तर ही प्रक्रिया करू नका. कारण त्यामुळे त्वचेला हानी पोहचू शकते, या पूर्ण प्रक्रीयेला तुम्ही 5-6 वेळा सहज करू शकता. यामुळे चेहऱ्यांच्या स्नायुंना खूप आराम मिळेल.

एक्सरसाईज 3

-3

ही एक्सरसाईज करताना आपल्या दोन्ही तर्जनी बोटांना नाकाच्या छिद्राजवळ ठेवा. आता ओ आकारामध्ये तोंड उघडा आणि होठांना आतल्या बाजूस दाबून घ्या. चेहऱ्याच्या स्नायुंना वरच्या बाजूला अधिक स्ट्रेच करा. आता वरच्या बाजूला पाहत न थांबता पापण्यांची उघडझाप करा, रीलेक्स व्हा आणि मग पुन्हा ही क्रिया करा. ही फेशियल एक्सरसाईज तुम्ही दिवसातून दहा मिनिटे करू शकता, यामुळे तुम्हाला खूपच फायदा होईल. काहीच वेळात तुम्हाला फरक दिसू लागेल.

थकवा दूर करण्याची सोपी पद्धत

आम्ही तुम्हाला अजून काही सोप्प्या पद्धती सांगत आहोत ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा थकवा दूर करू शकता. काम करताना मध्ये मध्ये पाणी पीत राहा, मात्र बसूनच हे पाणी प्या, काही तासांच्या गॅप मध्ये 1-10 पर्यंत आकडे मोजून मोठा श्वास घ्या, जर शक्य असेल तर प्रयत्न करा की दिवसातून 20 मिनिटे तुम्ही छोटीशी झोप घ्याल. यामुळे तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल आणि चेहऱ्यावर कोणताच थकवा देखील दिसणार नाही.

काही महत्त्वाच्या गोष्टी

तुम्ही या एक्सरसाईज दिवसातून कधीही करू शकता. फक्त या एक्सरसाईज सुरु करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि एखादे फेशियल ऑईल आणि मॉइस्चराइजर लावा, हात स्वच्छ करायला अजिबात विसरू नका, यामुळे तुम्हाला स्वत:ला नियमित रूपाने फरक जाणवू लागेल. तुम्हाला थकवा दूर झाल्याची जाणीव होईल आणि खूप फ्रेश वाटेल. त्यामुळे आवर्जून या एक्सरसाईज करा. कामातून वेळ काढा. जर तुम्ही ताण तणाव घेऊन काम करत राहिलात तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊन तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे कामाच्या व्यापातून अवघी 10 मिनिटे काढून देखील तुम्ही निरोगी राहू शकता. ही माहिती आपल्या मित्रमंडळींपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि त्यांना देखील ताण तणावयुक्त आयुष्यात निरोगी राहण्याच्या या सोप्प्या एक्सरसाईज सांगा.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here