Home महाराष्ट्र रस्त्यावर सर्व शस्त्रांसह लुटीसाठी तयार होती टोळी, पण…

रस्त्यावर सर्व शस्त्रांसह लुटीसाठी तयार होती टोळी, पण…

0
रस्त्यावर सर्व शस्त्रांसह लुटीसाठी तयार होती टोळी, पण…

यवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज ये-जा करणाऱ्या एका कृषी केंद्रचालकाला एका टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या टोळीचा डाव एलसीबीने उधळून लावला असून एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. तसंच पसार झालेल्या तिघांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

सौरभ महादेव काळे (२३) रा. उमरसरा असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे.

आर्णी मार्गावरील सम्राट धाब्याजवळ मेडिसीन एजंटचे ७२ हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या हेतूने पोलिसांनी मोर्चेबांधणी केली. त्यातूनच काल बुधवारी सांयकाळी एलसीबीचे पथक आर्णी मार्गाच्या दिशेने निघाले होते. दरम्यान मांगूळनजीक पाच ते सहा तरुण संशयास्पदरित्या या पथकाला आढळून आले.

पोलिसांनी वाहन थांबवून या युवकांकडे जात चौकशी केली. यावेळी युवकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे मिरची पावडर, चाकू आणि दोरी असे साहित्य आढळून आले.

यवतमाळ-आर्णी मार्गावरुन नेहमीच ये-जा करणाऱ्या कृषी केंद्रचालकाला लुटण्याचा प्रयत्न या टोळीचा होता, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. या टोळीतील सहापैकी तीन जण पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. सदर घटना यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असून पुढील तपास केला जात आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here