[ad_1]
म्हणूनच काही जणींच्या मनातून पार्टनरबद्दलच्या भावना कमीकमी होत जातात आणि मग दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो. बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी (Rekha) याच विषयाशी संबंधित एक विधान केल्याने खळबळ उडाली होती. प्रेमाच्या नात्यात भावनिक ओढच नगण्य असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं होतं. (फोटो – इंडिया टाइम्स)
रेखा यांचं मोठे विधान
यासिर उस्मान यांच्या ‘रेखा- कैसी पहेली जिंदगानी’ या पुस्तकामध्ये रेखा यांच्या जीवनाशी संबंधित न ऐकलेल्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. याबाबत रेखा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘पुरुषांशी शारीरिक जवळीकता निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण एखाद्या पुरुषाच्या अतिशय जवळ जाऊ शकत नाही.’
दरम्यान वैवाहिक जीवन सुरुळीत सुरू राहण्यासाठी शारीरिक जवळीक असणं खूप महत्त्वाचे असतात. पण ज्या नात्यामध्ये भावनाच नसतात, तेथे सारं काही व्यर्थच. बदलत्या काळानुसार आजकालचे तरुण-तरुणी त्यांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी नात्यामध्ये शारीरिक सुखापेक्षा भावनिक आनंदच अधिक महत्त्वाचा असतो. म्हणून भावनिकरित्या एकमेकांशी जोडलेले असल्याची जाणीव त्यांना होते.
(‘लग्न माझ्यासाठी तडजोड नव्हे’ ऐश्वर्याचे वैवाहिक जीवनावर मोठे विधान, बदलेल तुमचाही दृष्टीकोन)
भावनिक ओढ असल्यास नाते होईल मजबूत
लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत जोडप्यांमध्ये सर्वकाही सुरुळीत सुरू असते. पण दोन-चार वर्षांत नात्यातील शारीरिक जवळीकता संपू लागते, तेव्हा पती-पत्नीमधील अंतर वाढतं. एखादं नातं खराब होण्याची ही लक्षणे आहेत. एका संशोधनातील माहितीनुसार, कोणत्याही प्रेमसंबंधांमध्ये शारीरिक जवळीकतेपेक्षा भावनिक नाते अधिक घट्ट असणं महत्त्वाचे असते. कारण नात्यातील भावना कमी झाल्यास महिला आपल्या जोडीदारापासून विभक्त होण्याची शक्यता अधिक असते. तर शारीरिक संबंध कमी झाल्यास काही प्रकरणांत पुरुष आपल्या जोडीदाराची फसवणूकही करतात.
(तरुणी का करतात जोडीदाराला कायमचं ब्लॉक, तुम्हीही करताय ‘या’ मोठ्या चुका? जाणून घ्या कारणे)
असे नाते दीर्घकाळ टिकत नाही
भावनिक नाते मजबूत नसेल तर बहुतांश महिलांना आपल्या जोडीदारासोबत शारीरिक जवळीक साधणं सहज शक्य होत नाही, ही बाब नाकारता येणार नाही. रिलेशनशिप एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, शारीरिकरित्या जवळ असणे म्हणजे जोडीदारासोबत एकत्र राहणे, एकमेकांना वेळ देणे तर भावनिक नाते म्हणजे एकमेकांचे विचार जाणून घेणे, भावनिकरित्या एकमेकांशी जोडलेले असणे. यावरच कोणत्याही नात्याचे भविष्य अवलंबून असते. ज्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे भावनिक नातं नसतं, ती मंडळी नात्याद्वारे आनंद मिळवण्यासाठी संघर्षच करत असतात.
नाते टिकवण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची
रेखा यांनी केलेल्या विधानाचा विचार केला तर त्यांनी पती-पत्नीचे नाते शारीरिक जवळीकतेशी जोडलं होतं, पण बहुतांश लोकांना ही बाब योग्य वाटत नाही. कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन व्यक्तींना सर्वच प्रकारे एकमेकांशी जोडलेले असणं गरजेचं आहे. ही आवश्यकता शारीरिक तसंच भावनिकही असू शकते. पण पुरुषांची जवळीक केवळ शारीरिक संबंधाशी जोडून पाहणे, हे अयोग्य ठरेल.
वैवाहिक नात्याबद्दल विचार
आजच्या काळात बहुतांश मुलांना पाठिंबा देणारी, कायम सोबत राहणारी मुलगी जोडीदार म्हणून हवी असते. म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये वैवाहिक नात्याबाबत कित्येकांच्या विचारांमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळतंय.
[ad_2]
Source link