Home महाराष्ट्र करोना आकडेवारीत चढउतार कायम; आज करोनामुक्तांची संख्या घटली

करोना आकडेवारीत चढउतार कायम; आज करोनामुक्तांची संख्या घटली

0
करोना आकडेवारीत चढउतार कायम; आज करोनामुक्तांची संख्या घटली

मुंबई: राज्यात नवीन करोना बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या आज कमी राहिली. २४ तासांत ९ हजार ८३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५ हजार ८९० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. आज आणखी २३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १६ हजार २६ इतका झाला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )



राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. स्थिती सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. नवीन करोना बाधित आणि करोनातून बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत असला तरी त्यात फार मोठा फरक नसल्याचे दिसत आहे. आजच्या आकडेवारीचा विचार केल्यास करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज कमी राहिली. बुधवारी १० हजार ५६७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले होते तर आज ही संख्या ५ हजार ८९० पर्यंत खाली आली. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या १ लाख ३९ हजार ९६० इतकी असून त्यात सर्वाधिक १८ हजार ८८७ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहे तर मुंबई महापालिका क्षेत्रात १८ हजार ४१७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात १४ हजार ८८ तर कोल्हापूर जिल्ह्यात १३ हजार ४८५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

करोनाची राज्यातील आजची स्थिती:

– राज्यात आज २३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.९५ टक्के एवढा.
– २४ तासांत राज्यात ९ हजार ८३० नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ५ हजार ८९० रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५.६४ % एवढे.
– आजपर्यंत ३,८८,५७,६४४ कोविड चाचण्या झाल्या पूर्ण.
– ५९,४४,७१० (१५.३ टक्के) नमुने कोविडसाठी पॉझिटिव्ह आले.
– सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये.
– ४ हजार ९६४ व्यक्ती सध्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here