म्हणतात की मुलगी ही आपल्या वडिलांवर जाते आणि मसाबाच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू झाली आणि इंडियन व वेस्ट इंडीज पालकांच्या संगमात तिचा लूक थोडा वेगळा निघाला. तिच्या या लुकमुळे लहानपणापासूनच तिला खूप समस्यांचा सामना करावा लागला आहे.
१४ वर्षे करावा लागला पुरळांच्या समस्येचा सामना
आज मसाबाची स्कीन खूप सुंदर आणि क्लीन आहे पण तिच्या आयुष्यातील एक मोठा काळ असा होता की ऐक्ने जणू तिच्या राशीला पूजले होते. शिवाय जंक फूड ती खूप जास्त खात असल्याने तिचे वजन सुद्धा खूप वाढले होते. मसाबा म्हणते की प्रत्येक वेळी एक नवीन ब्रेकआउट सह मला ही जाणीव व्हायची की जंक फूड माझ्या स्कीनला खूप हानी पोहचवत आहे आणि मला हे वेळीच कंट्रोल केले पाहिजे. मात्र अशावेळी द्विधा मनस्थिती तेव्हा होते जेव्हा हजार लोक हजार प्रकारचे उपाय, सल्ले आणि कारणे सांगत असतात. म्हणजेच एकामागोमाग एक लोकांच्या तुमच्या स्कीन बद्दलच्या टिप्पण्या ऐकून तुम्हालाच स्वत:ची चीड येऊ लागते.
सर्वांसोबत हे घडते
मसाबा म्हणते की आज मुली मला मेसेज करून आणि सोशल मीडिया वर कमेंट करून विचारतात की मी माझ्या त्वचेमध्ये एवढा मोठा बदल आणला कसा? मी नक्की काय उपाय केले? तेव्हा मी एवढेच सांगते की, “स्कीन प्रॉब्लेम आणि वजन या संबंधित समस्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी येतात. कोणताही मनुष्य त्यातूनच चुकलेला नाही. पण अशावेळी निराश न होता प्रयत्न करत राहिले पाहिजेत. एक दिवस असा येईल की तुम्ही सुद्धा इतरांप्रमाणे सौंदर्य अनुभवू लागाल. फक्त प्रयत्न सोडू नका, उपाय ट्राय करत राहा.”
स्त्रियांना आपल्या शरीराबाबत काय हवे असते?
मसाबाचे म्हणणे आहे की स्त्रियांना आपल्या शरीरावर सतत काम करणे आणि त्याची काळजी घेणे याचा कंटाळा वाटतो. पण त्यांनी हे समजून घ्यायला हवे की जेवढ्या त्या आपल्या शरीराची काळजी घेतील तेवढ्या त्या अधिक आंनदी राहतील. कारण जर तुम्ही स्वत:च्या शरीराची काळजी घ्याल तर तुम्हाला कोणी हसणार नाही आणि तुम्ही मानसिकरित्या खूप आनंदी राहाल. मसाबाची ही गोष्ट त्या स्त्रियांसाठी खूप गरजेची आहे ज्या आपली बॉडी शेप, फिचर्स आणि कलर बाबत खूपच न्यूनगंड बाळगतात आणि सुंदर दिसण्याच्या इच्छेने नेहमी तणावात राहतात.
ब्युटी आहे योग्य हेल्थ व कॉस्मेटीकचे मिश्रण
मसाबा आपल्या ऐक्ने स्ट्रगल आणि वेट लॉस बाबत सांगतात म्हणते की, “लोक सल्ला देण्याआधी हा विचार अजिबात करत नाहीत की आपण देखील आपल्या बाजूने प्रयत्न करत आहोत. आपल्याला सुद्धा सुंदर दिसायचे आहे. लोकांच्या बोलण्यातून हेच जाणवत राहते की आपण कमी पडतोय आणि ही गोष्ट अधिक निराशाजनक असते. माझे म्हणणे आहे की ब्यूटी हेल्थ आणि कॉस्मेटिक दोघांचे योग्य संतुलन आहे. मी अशा अनेक लोकांना ओळखते हे खूप बारीक आहेत आणि फिट आहेत पण स्वत:च्या दिसण्याबाबत खुश नाहीत. बारीक असणाऱ्यांना थोडी बॉडी हवी आहे आणि जाड असणाऱ्यांना बॉडी कमी करायची आहे. त्यामुळे दिसणे आणि हेल्थ दोघांचे संतुलन राखता आले पाहिजे.
खिल्ली उडवणाऱ्यांना कसे सामोरे जावे
मसाबा गुप्ताला केवळ लहानपणीच बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले असे नाही. आज ती स्वत: एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून सुद्धा तिला अनेकांकडून बॉडी शेमिंग बाबत कमेंट्स ऐकायला मिळतात. केवळ तिचा रंग वेगळा आहे आणि तिचा लूक वेगळा आहे म्हणून लोकं तिच्यासाठी खूप वाईट वाईट शब्दांचा प्रयोग करतात. एका कुमारी मातेची मुलगी म्हणून तिला हिणवतात. पण मसाबा आता या सर्वांना तोंड देण्यास शिकली आहे. तिच्या मते जग काय म्हणते याचा विचार करत बसणे म्हणजे स्वत:ला अधिक त्रासात टाकण्यासारखे आहे. त्यापेक्षा स्वत:वर काम करा आणि जगपुढे स्वत:ला सिध्द करा.
उत्तर देणं गरजेचं असतं
मसाबा या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना करते आणि अधिकाधिक ट्रोलर्स आणि त्रास देणा-या लोकांना सडेतोड उत्तर देते. करीना कपूर खानच्या रेडिओ शोमध्ये मसाबाने सांगितले की तिची आई नीना गुप्ता अनेकदा सांगते की अशा अज्ञात लोकांवर वेळ वाया का घालवू नकोस, पण मसाबाचे याबाबत थोडे वेगळे मत आहे. अशा लोकांना उत्तर देणे आवश्यक आहे असं मसाबाचं म्हणणं आहे. कारण जेव्हा आपण आपला मुद्दा त्यांच्यासमोर ठेवतो तेव्हा त्यांच्या विचारांची व्याप्ती वाढते. ते कुठे चुकत आहेत हे त्यांना समजते. प्रत्येक प्रकरणात असेच होत नाही. पण ब-याचदा असं घडतं.