Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांची मोठी घोषणा

पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांची मोठी घोषणा

0
पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे, 19 जून: उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी पुण्यातील (Pune Corona Virus) स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुण्यात शनिवार आणि रविवार दुकानं बंद (Pune Weekend Lockdown) राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटकांच्या गर्दीला चाप लावण्यासाठी जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांनी यावेळी अजून कठोर निर्बंध लावण्याचा इशाराही पुणेकरांना दिला आहे. तसंच विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाणार असल्याचंही माहिती त्यांनी दिली.

अजित पवार यांनी आज पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी सर्व बंद राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू असणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी रायगड,रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही जिल्ह्यात अद्याप कोरोनाचं प्रमाण जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं.

तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची ठरू शकते असं म्हणतात. पालकांनी घाबरु नये. आपल्याला त्याला संपूर्ण तयारीनिशी सामोरे जायचे असल्याचंही ते म्हणालेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे अशा विद्यार्थ्यांनी कोविशिल्ड (कोवॅक्सिन लशीला अजून परदेशात मान्यता नाही यामुळं विद्यार्थी काळजीत )घेऊ नका, असं आवाहनही अजित पवारांनी केलं.

पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक जण लोणावळा, महाबळेश्वर अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी करत आहेत. नागरिक असं का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असंही अजित पवार म्हणालेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here