अनोखे आंदोलन; ‘बेरोजगार अधिकाऱ्यांनी’ कापला वर्षपूर्तीचा केक

0
159

औरंगाबाद : मी उपजिल्हाधिकारी तरी बेरोजगार, माझे कुटुंब माझी जबाबदारी, विनापगारी आम्ही बेरोजगार अधिकारी, अशा आशयाचे हाती फलक घेत राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्तीसाठी वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वर्षपूर्तीचा केक कापून आंदोलन केले. (no appointment even after passing the state service examination)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१९ परीक्षा ४१३ पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी, पोलिस उप अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा महत्वाच्या पदांवर निवड होऊन वर्ष झाले. परंतु अद्याप नियुक्ती नाही. नियुक्तीबाबत शासन उदासिनता दाखवित असल्याने उमेदवारांनी शनिवारी राज्यभरात औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक अशा विविध ठिकाणी वर्षपूर्ती निमित्त केक कापला.



केकवर हताश अधिकारी असा उल्लेख होता. हा केक पात्र उमेदवारांनी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कापत वर्षीपूर्ती साजरी करत या प्रकरणी तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी केली. पाच-सहा वर्ष अभ्यास करून सरकारी सेवेत रूजू होण्याचे स्वप्न पाहिले परंतु शासन दरबारी नियुक्तीला वर्ष-वर्षभर सामोरे जावे लागत असल्याचे उमदेवारांनी सांगितले. निवड होऊनही ठरूनही नियुक्ती नसल्याने आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.



नियुक्ती द्या बेरोजगारांना रोजगार द्या, मी उद्योग अधिकारी भिकारी अशा स्वरूपाची फलक हाती घेत उमदेवारांनी राज्यशासनाचा निषेध केला. यावेळी मराठवाड्यासह इतर विविध जिल्ह्यातील उमेदवार सहभागी झाले होते.
मुख्यमंत्रिपदाची जागा रिकामी नाही; प्रफुल्ल पटेल यांनी लगावला टोला

Source link