पुणे, 19 जून: राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला (Covid Vaccination program) वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण (Vaccination) लवकरात लवकर करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. या लसीकरण मोहिमेच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) पुरंदर तालुक्यातील (Purandar Tehsil) बहिरवाडी (Bahirwadi Village) येथील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे. शंभर टक्के लसीकरण पुर्ण झालेले बहिरवाडी हे देशातील पहिले गाव ठरले आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी दिली आहे.
बहिरवाडी हे गाव दुर्गम असून स्थानिक ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या पुगावातील सर्व वयोगटातील व्यक्तींना पहिला डोस अर्थात कोरोनाची लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. कोरोनामुक्त असलेले हे गाव आता गावातील सर्व लाभार्थींना पहिला डोस मिळालेले गाव ठरले आहे.