Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उन्नाड पुणेकरांची लाडक्या भुशी डॅमवर तुफान गर्दी, पर्यटनबंदीची ऐशीतैशी

उन्नाड पुणेकरांची लाडक्या भुशी डॅमवर तुफान गर्दी, पर्यटनबंदीची ऐशीतैशी

0
उन्नाड पुणेकरांची लाडक्या भुशी डॅमवर तुफान गर्दी, पर्यटनबंदीची ऐशीतैशी

पुणे, 20 जून : पुण्यात (Pune Corona cases) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण निर्बंध शिथिल केल्यामुळे पुणेकरांचा बेफिकरपणा समोर आला आहे. लाडक्या भुशी डॅमवर (pune bhushi dam) पर्यटकांनी एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाली आहे. पर्यटनबंदी (tourist ban) असतानाही उन्नाड पुणेकरांनी एकच गर्दी केली आहे.

पुण्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे आज रविवार असल्यामुळे पुणेकरांनी भुशी डॅमवर एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे. पर्यटन बंदी असतानाही पुणेकरांनी एकच गर्दी केली आहे.  कोविडचे नियम पायदळी तुडवत पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत.

विशेष म्हणजे, शनिवारी सुद्धा पर्यटकांनी अशीच गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुद्धा केली होती. पण कारवाईनंतरही आज पुन्हा पर्यटक मोठ्या संख्येने भुशी डॅमवर दाखल झाले आहे. त्यामुळे पोलीस काय कारवाई करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

सिंहगड, खडकवासला परिसरात 500 रुपये दंड व गुन्हा दाखल

दरम्यान,  शनिवार, रविवार तसेच इतर दिवशी खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मागील रविवारी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. प्रत्यक्षात मात्र पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, सिंहगड किल्ला व आजुबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत.

मागील रविवारी झालेली पर्यटकांची गर्दी व त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांनी या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर कडक शनिवारी कारवाई करण्यात आली होती. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, खडकवासला धरण चौक, डोणजे फाटा, गोळेवाडी चेक पोस्ट, खेड शिवापूरकडून येणाऱ्यांसाठी कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त व नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे.  फिरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188 नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here