[ad_1]
मुंबई : देशभरात 21 जून म्हणजेच, आजपासून केंद्र सरकार प्रत्येक राज्यात 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण करणार आहे. कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांकडून एकूण लसीच्या 75 टक्के भाग भारत सरकार स्वतः खरेदी करुन राज्य सरकारांना मोफत देणार आहे. तसेच भारतात तयार होणाऱ्या लसींपैकी 25 टक्के लसीचे डोस खाजगी रुग्णालयं थेट विकत घेऊ शकणार आहेत. तशी परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
खाजगी रुग्णालयं कोरोना लसीच्या निर्धारित किमतीहून एका डोसवर अधिकाधिक 150 रुपये सर्विस चार्ज आकारू शकणार आहेत. यावर लक्ष ठेवण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकार राज्यांची लोकसंख्या, संसर्ग झालेल्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग या सर्व बाबींचा सारासार विचार करुन लसींचे डोस पुरवणार आहे.
विशेष म्हणजे, अनेक राज्य सरकारांनी सुचवले होते की, त्यांना स्थानिक आवश्यकतानुसार लसींची थेट खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी. यानंतर भारत सरकारने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली होती. त्यानंतर मोदींनी जनतेला संबोधित करताना 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण भारत सरकार मोफत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मोदी म्हणाले होते की, “देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.”
लसीबाबत अफवा पसरवणाऱ्या लोकांनाही मोदींनी इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “जे लोक लसीबद्दल संशय निर्माण करत आहेत आणि अफवा पसरवत आहेत ते निरपराध नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा अफवांबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.”
मुंबईत आजपासून 18 ते 29 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण नाही, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय
मुंबईत आजपासून 18 ते 29 या वयोगटाचं लसीकरण करण्यात येणार नाही. गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. केंद्रानं जाहीर केल्यानुसार आजपासून देशभरात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरु होणार आहे. परंतु, गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं दोन गटांत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आजपासून 18 ते 29 या वयोगटाचं लसीकरण करण्यात येणार नसून 30 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं जाणार आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील अनेक राज्यांकडे आणि केंद्र शासित प्रदेशांकडे 3.06 कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस उपलब्ध आहेत. पुढील तीन दिवसांत त्यांना 24.53 लाखांहून अधिक लसीचे डोस दिले जाणार आहेत. मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशातील राज्यांनी आण केंद्र शासित प्रदेशांना केंद्र सरकारनं आतापर्यंत 29,10,54,050 हून अधिक लसीचे डोस मोफत पुरवले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]
Source link