Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र Suicide of a manager: कामाचा ताण असह्य झाला; फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

Suicide of a manager: कामाचा ताण असह्य झाला; फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

0
Suicide of a manager: कामाचा ताण असह्य झाला; फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

जळगाव शहरातील फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने आज सोमवारी सकाळी ६.३० वाजेपूर्वी कामाच्या तणावातून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रदीप धनलाल शिंपी (कापुरे, वय ४५, रा. मयुर कॉलनी) असे मृत मॅनेजरचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या तिन पानांच्या चिठ्ठीत त्यांनी कामाचा ताण जास्त झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्यावर कामाचा ताण टाकून छळ करणाऱ्या कंपनीतील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली आहे. (Suicide of a manager of a finance company in Jalgaon due to unbearable work stress)

जळगावातील मुथ्थूट होमफिन इंडीया लिमीटेड या फायनान्स कंपनीत मृत प्रदिप शिंपी १ नोव्हेंबर २०१७ पासून क्रेडीट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. जळगावसह औरंगाबाद, धुळे व शिरपुर विभागाची जबाबदारी होती. काल रविवारी (२० जून ) कुटुंबीयांसह एका कार्याक्रमासाठी नातेवाईकांकडे गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर ते एकटेच बाहेरच्या हॉलमध्ये झोपले होते. त्यांच्या पत्नी व दोन्ही मुले मागच्या खोलीत झोपलेले होते. रात्रीतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६.३० वाजता ही घटना उघडकीस आली. यावेळी त्यांच्या पत्नी सुचिता यांना जबर धक्का बसला.



कुटुंबाला मदत करण्याची सुसाईट नोटमध्ये विनंती

शिंपी यांनी तीन पानांची सुसाईट नोट लिहीली आहे. यात त्यांनी कामाचा ताण, अतिरीक्त दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. कमी मनुष्यबळात खुप काम करावे लागते आहे, यातच अतिरीक्त काम देऊनही वेळेत पुर्ण करण्यासाठी दबाव टाकला जातो. नोकरी जाण्याची भिती वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. कंपनीतील इतर सहकारी, अधिकारी, कंपनी मालकांनी माझ्या नंतर कुटंुबीयांना मदत करा. भविष्य निर्वाह निधी, पेंन्शन, आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांना मदत करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.



कर्जप्रकरणांमध्ये फसवणुक झाल्यानेही नैराश्य

जामनेर तालुक्यातील येथील १० ते १२ जणांनी फायनान्समधुन बोगस कागदपत्र सादर करुन मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. हे प्रकार नुकतेच समोर आले. तसेच या कर्जदारांकडून वसुली करण्याची जबाबदारी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी शिंपी यांच्यावर टाकली होती. वसुली न झाल्यास तुमच्याकडून पैसे वसुल करु अशा असा इशारा त्यांना दिला होता. त्यामुळे देखील ते नैराश्यात असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगीतले.



अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

कंपनीमधील कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पुणे येथील कंपनीचे अधिकारी यांनी दिलेल्या अतिरीक्त ताणामुळे पतीने आत्महत्या केली अाहे. या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तेंव्हाच मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा शिंपी यांच्या पत्नी सुचिता यांनी घेतल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आश्वासन देत समजुत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृत शिंपी यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगा कुणाल (वय १५), मुलगी यज्ञा (वय ५), आई सूमनबाई आणि बहिण रेखा शिंपी असा परिवार आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here